शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

Pune Ganpati: गणेश विसर्जनापर्यंत शहरातील 'हे' रस्ते वाहतुकीसाठी सायंकाळी ५ नंतर राहणार बंद

By नितीश गोवंडे | Published: September 13, 2024 3:36 PM

भाविकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतुक शाखेकडून शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सव आणि पुण्यातील गणेश मंडळांचे देखावे ही पुण्याची ओळख सर्वदूर आहे. देशभरासह विदेशातून असंख्य भाविक पुण्यातील गणेश मंडळांना भेटी देत असतात. भाविकांना वाहनांमुळे अडचण निर्माण होऊ नये, वाहतुक कोंडी होऊ नये, अपघात होऊ नयेत यासाठी तसेच भाविकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतुक शाखेकडून शहरातील काही रस्ते सायंकाळी ५ नंतर गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. बुधवार (दि. १८) पर्यंत हे रस्ते गरजेनुसार बंद राहणार असल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

वाहतुकीस बंद असलेले रस्ते व पर्यायी मार्ग

१) लक्ष्मी रोड - हमजेखान चौक ते टिळक चौक

पर्यायी मार्ग : १) डुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दारूवाला पुल मार्गे इच्छितत्त्थळी जावे.

२) हमजेखान चौक डावीकडे वळून महाराणा प्रताप रोडने सरळ घोरपडी पेठ पोलीस चौकी पुढे शंकर शेठ रोडने इच्छित स्थळी जावे.३) सोन्यामारूती चौक डावीकडे वळून मिर्जा गालीब रोड जंक्शन (सरळ पानघंटी चौक सरळ सोलापूर रोडवरुन इच्छितस्थळी जावे)

२) शिवाजी रोड - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक

पर्यायी मार्ग : १) शिवाजीनगरवरुन स्वारगेट कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स.गो.बर्वे चौक-जे.एम. रोड-अलका चौक टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा किंवा सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक बोल्हाई चौक मार्गे नेहरु रोडचा वापर करुन स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा.२) कुंभारवेस चौक- पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रोड मार्गे घोरपडी पेठ पोलीस चौकी, घोरपडी पेठ उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रोड.

३) वाहतुकीचे परिस्थितीनुसार दुचाकी वाहने ही गाडगीळ पुतळा, लालमहल पर्यंत सोडण्यात येतील तेथून दुचाकी वाहनचालकांनी डावीकडे वळण

३) बाजीराव रोड - पूरम चौक ते आप्पा बळवंत चौक

पर्यायी मार्ग : पूरम चौक, टिळक रोडने टिळक चौक उजवीकडे वळून केळकर रोडने आप्पा बळवंत चौक.(पूरम चौक ते गाडगीळ पुतळा दरम्यान जाण्यासाठी करण्यात आलेली एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात टेलिफोन भवन ते पूरम चौक दरम्यानच्या रस्त्यावर दुहेरी करण्यात येईल.)

४) टिळक रोड - मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक

पर्यायी मार्ग : जेधे चौक, नेहरू स्टेडियम समोरील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पुरम चौक व हिराबाग (पीएमपी व रिक्षा व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद)

५) सिंहगड गॅरेज, घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण ते हिराबाग चौक

पर्यायी मार्ग : सिंहगड गॅरेज चौकातून सरळ मन्साराम नाईक रस्त्याने डॉ. कोटनीस हॉस्पीटल शिवाजी रस्ता क्रॉस करून शिंदे आळीतून बाजीराव रस्ता क्रॉस करून भिकारदास चौकी चौक, खजीना विहीर चौकातुन वळून टिळक रोडने वाहन चालकांनी इच्छित स्थळी जावे.

६) दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक (जोशी आळी) हिराबाग चौक

पर्यायी मार्ग : दिनकरराव जवळकर पथने सरळ बाजीराव रोड डावीकडे वळून टेलिफोन भवन त पूरम चौक, टिळक रोडने वाहन चालकांनी इच्छित स्थळी जावे.

७) कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ (जगदीश गॅरेज उपरस्ता) ते टिळक रोडकडे जाण्यास बंदीपर्यायी मार्ग : लहान रस्ता असल्याने पर्यायी मार्ग दिलेला नाही. (गल्ली आहे.)

८) सणस रोड : गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक

पर्यायी मार्ग : गोटीराम भैय्या चौक, गाडीखाना, सुभेदार तालीम, डावीकडे वळून कस्तुरे चौक, डावीकडे वळून गोविंद हलवाई चौक या रस्त्याचा वापर करावा.

९) पानघंटी चौक ते गंज पेठ चौकी

पर्यायी मार्ग : पानघंटी चौक, जैन मंदीर चौक, फुलवाला चौक, कस्तूरे चौक, उजवीकडे वळून गंज पेठ चौकी मार्गे इच्छित स्थळी जावे.

१०) गंजपेठ चौकातून वीर लहुजी वस्ताद तालीमकडे जाण्यास बंदी

पर्यायी मार्ग : लहान रस्ता असल्याने पर्यायी मार्ग दिलेला नाही. (अरुंद आहे)

११) गावकसाब मशिद ते सेंट्रल स्ट्रीट चौकी

पर्यायी मार्ग : १) गावकसाब मशिद, बाबाजन चौक, सरबतवाला चौक, सेंट्रल स्ट्रीट चौकी.

२) गावकसाब मशिद, सेंट्रल स्ट्रीट. इंदिरा गांधी चौक, डावीकडे वळून भगवान महावीर चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.

१२) कोहिनूर चौक ते बाबाजान चौक

पर्यायी मार्ग : कोहिनुर चौक, भगवान महावीर चौक, डावीकडे वळून सरबतवाला चौक डावीकडे वळून बाबाजान चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

१३) जेधे प्रसाद रस्ता / सुभानशहा रस्ता, पार्श्वनाथ चौक (नाईक हॉस्पिटल) ते शास्त्री चौक, सुभान शहा दर्गा ते सोन्या मारूती चौक

पर्यायी मार्ग : पार्श्वनाथ चौक (नाईक हॉस्पीटल) डावीकडे वळून सुभेदार तालीम चौक, सरळ शिवाजी रोडने शिंदे आळीतून इच्छित स्थळी जावे. किंवा पार्श्वनाथ चौक, फुलवाला चौक, कस्तूरे चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.

या बंद केलेल्या मार्गावर तसेच या मार्गांना मिळणाऱ्या उपरस्ते, गल्ल्यांमधून स्थानिक वाहतूकीव्यतिरिक्त येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शिवाजी रोड - जिजामाता चौक ते मंडई चौक, मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रोड - शनिपार ते फुटकाबुरूड पर्यंत, आप्पा बळवंत ते बुधवार चौक पर्यंत दोन्ही बाजूंना नो-पार्किंग करण्यात आले आहे. तसेच हे बदल पादचाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन करण्यात येणार असल्याची माहिती वाहतुक शाखेकडून देण्यात आली

विसर्जन मिरवणुकीवेळी असा असेल पोलिस बंदोबस्त...

अपर पोलिस आयुक्त - ४

पोलिस उपायुक्त - १०सहायक पोलिस आयुक्त - २३

पोलिस निरीक्षक -१२८सहाय्यक पोलिस निरीक्षक - ५६८

पोलिस कर्मचारी - ४ हजार ६०४होमगार्ड - ११००

राज्य राखीव पोलिस दल - १ तुकडीकेंद्रीय सुरक्षा दल, शीघ्र कृती दल - १० तुकड्या

विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था...

कार आणि दुचाकी वाहनांसाठीची पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे...न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ, (दुचाकी, चारचाकी), एच. व्ही. देसाई महाविद्यालय, (पोलिस पार्किंग), हमालवाडा, नारायण पेठ, (दुचाकी, चारचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ, (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर, (दुचाकी, चारचाकी), स. प. महाविद्यालय, (दुचाकी, चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग, (चारचाकी), पेशवे पार्क, सारसबाग, (दुचाकी), हरजीवन हाॅस्पिटल, सारसबाग, (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक, (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूल, (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा, (दुचाकी), गणेश मळा ते राजाराम पूल, (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह, (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना, (दुचाकी), आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता, (दुचाकी, चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता, (दुचाकी, चारचाकी)

आपटे प्रशाला, (दुचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय, (दुचाकी, चारचाकी), जैन हाॅस्टेल, बीएमसीसी रस्ता, (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा महाविद्यालय, (दुचाकी), पेशवे पथ, (दुचाकी), रानडे पथ, (दुचाकी, चारचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर, (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता, (दुचाकी, चारचाकी), नदीपात्र, भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी, चारचाकी)

शहराच्या मध्यभागात मानाच्या गणपतींचे दर्शन, तसेच देखावे पाहण्यासाठी पुणे शहर, तसेच जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होते. उत्सवाच्या काळात परगावाहून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यंदा भाविकांना कार तसेच दुचाकी लावण्यासाठी २७ ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. - अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४ganpatiगणपती 2024SocialसामाजिकTrafficवाहतूक कोंडी