शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आयसिसशी संबंधित पुण्यातील तरुणीसह दोघांना सक्तमजुरी, न्यायालयाकडून ५ दहशतवाद्यांना शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:09 AM

या प्रकरणात पुण्यातील एका तरुणीसह वेगवेगळ्या कलमांन्वये दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे...

पुणे : देशभरात दहशतवादी कारवायांच्या तयारीत असलेल्या पाच दहशतवाद्यांनादिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणात पुण्यातील एका तरुणीसह वेगवेगळ्या कलमांन्वये दोघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

जहानजेब सामी वाणी, त्याची पत्नी हिना बशीर बेग (दोघे रा. ओखला विहार, जामियानगर), सादिया अन्वर शेख (रा. विश्रांतवाडी, पुणे) नबील एस. खत्री (रा. कोंढवा, पुणे), अब्दुर बसित अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. दिल्लीतील विशेष न्यायालयाने आरोपी जहानजेब सामी याला विविध कलमांन्वये दोषी ठरवून २० वर्षांची शिक्षा, त्याची पत्नी हिना बेग हिला सात वर्षांची शिक्षा तसेच सादिया शेखला सात वर्ष, तसेच नबील खत्रीला आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. अब्दुर बसित याला शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, त्याने शिक्षेचा कालावधी न्यायालयीन कैदेत पूर्ण केला आहे. बसितने आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सामीला ‘व्हाॅइस ऑफ हिंद’ हे मासिक सुरू करण्यासाठी मदत केली होती. या खटल्यात डाॅ. रहमानविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, अद्याप त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली नाही.

मार्च २०२० मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) जहानजेब वाणी आणि त्याची पत्नी हिना यांना अटक केली होती. आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार आणि देशविघातक कारवायांमध्ये दोघे सामील असल्याचे उघड झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आरोपी देशातील महत्त्वाच्या शहरात बाॅम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील सादिया अन्वर शेख, नबील एस. खत्री सामील असल्याचे उघडकीस आले होते.

त्यानंतर दोघांना एनआयएच्या पथकाने पुण्यातून अटक केली होती. चौकशीत बंगळुरूतील डाॅक्टर अब्दुर रहमान याचे नाव निष्पन्न झाले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयसिसच्या दहशवादी विचारधारेच्या प्रभावाखाली आलेला डाॅ. रहमान डिसेंबर २०१३ मध्ये सिरियात गेल्याचे निष्पन्न झाले. सिरियात आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये डाॅ. रहमान सामील झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध एनआयएने २० मार्च २०२० रोजी दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र १२ जानेवारी २०२१ रोजी दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :ISISइसिसTerrorismदहशतवादCourtन्यायालयdelhiदिल्लीPuneपुणे