शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ कायदा लागू झाल्यानंतर गावकऱ्यांना आली पहिली नोटीस; खाली करा नाहीतर कर द्या, तामिळनाडूत खळबळ
2
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: बुधवारी गणेश पूजनाला विशेष महत्त्व; पाहा, महात्म्य, मान्यता
3
द्वारका किती प्राचीन आहे? हे जाणून घेण्यासाठी, एएसआयने समुद्राखाली चालवली विशेष मोहीम
4
IPL 2025: MS Dhoni म्हणजे 'ब्रँड' ! उभं केलंय कोट्यवधींचं साम्राज्य; जाणून घ्या नेटवर्थ किती?
5
'या' लोकांना मिळणार नाही आयुष्मान कार्ड; तुमचे नाव तर यादीत नाही ना? असे तपासा ऑनलाईन
6
IPL 2025: CSKचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये जायचं नाही... लखनौमध्ये फॅन्सना आला विचित्र अनुभव (Video)
7
नितिश कावलियावर ३ वर्षांची निलंबनाची कारवाई; ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब
8
Mangal Neptune Yuti 2025: २० एप्रिल रोजी तयार होणारा नवपंचम राजयोग उघडणार 'या' तीन राशींचे भाग्य!
9
तीन वनडे, तितक्याच सामन्यांची टी-२० मालिका, टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याचं वेळापत्रक आलं
10
"राया करा एक इशारा, आलेच मी..!" सई ताम्हणकरची शानदार लावणी, 'देवमाणूस'मधलं गाणं रिलीज
11
पृथ्वीवरील एकमेव ठिकाण, जिथून दिसतं भविष्य, पण माणसांना जाण्यास आहे सक्त मनाई, कारण काय? 
12
मोठी बातमी! मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेले ७ निर्णय...
13
काठ्या, पाईप अन्...; घरात मित्राला पाहून पती भडकला, मशिदीत केली पत्नीची तक्रार; जमावानं दिली 'तालिबानी शिक्षा'
14
तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा विधानसभेत प्रस्ताव; CM एम.के स्टॅलिन यांची मोठी खेळी
15
ऐरोलीमधील टी भारत बिजली जंक्शन अंडरपास रस्ता दोन दिवस वाहतुकीसाठी राहणार बंद!
16
कौतुकास्पद! विनोद कांबळीला मदत करण्यासाठी सुनील गावस्कर सरसावले; दरमहा देणार 'इतके' पैसे
17
'बीडपेक्षा सिंधुदुर्गात मोठी दहभत! नग्न करुन तरुणाची हत्या केली'; वैभव नाईकांचा गंभीर आरोप
18
लाडक्या बहिणींना आता फक्त ५०० रुपयेच मिळणार; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका, म्हणाले...
19
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: वर्षभर बाप्पा कृपा करेल; चंद्रोदयाला ‘हे’ कराच, पुण्य लाभेल
20
गुंतवणूकदारांकडे गोल्डन चान्स, 'या' ५ स्टॉक्सवर HSBC बुलिश; कोणते आहेत शेअर्स, काय आहे टार्गेट प्राईज?

लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे; रामदास आठवले यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 19:40 IST

राज्यात महायुतीची सत्ता आली. त्यामुळे सध्याच्या सरकारने दिलेले आश्वासन पाळावे व ते पूर्ण करावे

- हिरा सरवदेपुणे : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. त्यामुळे सध्याच्या सरकारने दिलेले आश्वासन पाळावे व ते पूर्ण करावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

पुणे दौऱ्यावर आल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रिपाइंचे प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, शैलेंद्र चव्हाण, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, विरेन साठे, पदाधिकारी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षामध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे काही प्रमाणात अस्वस्थता आहे. मात्र, महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येण्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा मिळणे आवश्यक आहे. विशेषत: पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी जनता वास्तव्य करीत आहे. त्यामुळे पुण्याचे महापौरपद आरक्षित झाल्यास ते रिपब्लिकन पक्षाला मिळावे, अशी मागणी ही त्यांनी केली.

पुण्यात भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे

पुणे रेल्वे स्थानकाजवळ आंबेडकर भवनच्या मागे दोन एकरचा भूखंड रिकामा आहे. या जागेवर भव्य आंबेडकर स्मारक उभारले जावे, अशी आपली मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. ही जागा कर्करोग रुग्णालयासाठी मागितली. जात असली तरी देखील रुग्णालयासाठी इतर जागा निवडण्यात यावी. आपला विरोध रुग्णालयाच्या उभारणीला नाही. रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. मात्र, आंबेडकर भवन नजीकच्या जागेवर आंबेडकर स्मारक उभारले जावे, असा आपला आग्रह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRamdas Athawaleरामदास आठवले