(स्टार १०७२ डमी)
पुणे : सध्या पुण्यातील बाजारपेठेत ड्रायफ्रुट्सचा महिनाभर पुरेल एवढा साठा आहे. बाजारपेठेतील दरही स्थिर आहेत. आफगाणिस्तानातून अंजीर, जर्दाळू, खिसमिस बदाम,
शाहाजिरा (मस्का जीरा) आदी आयात केले जात आहेत. मात्र अंजीर, जर्दाळू हे दोन ड्रायफ्रुट सोडले तर इतर ड्रायफ्रुट कमी-अधिक प्रमाणात भारतातही उत्पादित केले जात आहेत. खजूर, पिस्ता आणि मामरा बदाम हे इराणकडून येतात. अफगाणिस्तानामधील तणावाच्या परिस्थितीचा सध्यातरी पुण्यातील बाजारपेठेवर कोणताही परिणाम जाणवत नाही.
अफगाणिस्तानने बुधवारी भारताबरोबरचे व्यापारीसंबंध थांबवले आहेत. कोणतीही वस्तू आयात किंवा निर्यात करण्यास बंदी घातली आहे. विशेष करून अफगाणिस्तानमधून भारतात केवळ अंजीर आणि जर्दाळूची आयात केली जाते. त्याचा भारतीय बाजारपेठेवर फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे पुण्यातील व्यापाऱ्यांनी सांगितले. काळा, पिवळा बदामसही इतर ड्रायफ्रुटसचे भारतात देखील उत्पादन होत आहे. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही.
------
* हे पाहा भाव (प्रति किलो)
ड्रायफ्रुट सध्याचे भाव
अफगाणी अंजीर ७००-१२००
अफगाणी जर्दाळू २५०-५००
अफगाणी खिसमिस ४००-६००
अफगाणी बदाम ८०० (स्थिर)
अफगाणी शाहाजिरा (मस्का जीरा) ४४०-५००
इराणी खजूर (विविध प्रकार) ३०-१०००
इराणी पिस्ता १०५०-१४००
इराणी मामरा बदाम १५००-४०००
-----
* महिनाभर पुरेल एवढा साठा उपलब्ध
पुणे शहरातील बाजारपेठेत सध्या एक महिनाभर पुरेल एवढा ड्रायफ्रुटसचा साठा आहे. दरात कोणत्याही प्रकारची वाढ नाही. सर्व ड्रायफ्रुटसचे दर स्थिर आहेत. अंजीर, जर्दाळू हे दोन ड्रायफ्रुट विशेष करून अफगाणिस्तानातून येत आहेत. सध्या व्यापाराला बंदी घातली असली, तरी फारसा फरक पडणार नाही. आपण इराणमार्गे मागवू शकतो.
----
सध्या महिनाभर पुरेल एवढा साठा आहे. पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारे भाव वाढ करू नये, असे सांगण्यात आले आहे. मात्र, किरकोळ बाजारात अनेक छोठे-मोठे दुकानदार हे अफगाणिस्तानच्या तणावाचे कारण सांगून चढ्या दराने ड्रायफ्रुटस विकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना याबाबी लक्षात घ्याव्यात.
- नवीन गोयल, ड्रायफ्रुट होलसेल व्यापारी