" पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही..!"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 05:38 PM2021-01-01T17:38:48+5:302021-01-01T17:52:50+5:30

पुणे शहर किंवा पिंपरी चिंचवड येथील वाढत्या लोकसंख्येचा भार शेती क्षेत्राला कदापि पेलवणारा नाही.

Pune has state coffers so no need to worry: Devendra Fadnavis | " पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही..!"

" पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही..!"

Next

पुणे : पुणे व पिंपरी शहराची वाढ झपाट्याने होत आहे. त्यात महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराच्या गरजा देखील वाढणार आहेत. मेट्रो, पिण्याचे पाणी, वाहतूक, उदयॊग धंदे, आरोग्य यांचा समावेश आहे. परंतू, पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही . कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे, अअशी मिश्किल टिपण्णी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पुणे शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हा सोहळा महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी झाला. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ , महापालिका आयुक्त विक्रम कुमार , जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, पुणे शहर किंवा पिंपरी चिंचवड येथील वाढत्या लोकसंख्येचा भार शेती क्षेत्राला कदापि पेलवणारा नाही. पाणी हे जरी इकॉनॉमी कमोडिटी असले तरी त्याचा सर्वार्थाने योग्य वापर होणे गरजेचे आहे. पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे त्यामुळं चिंता करायची गरज नाही. 

अजित पवार म्हणाले, पुण्याची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. साडे पाच टीएमसी पाण्याची गरज असणाऱ्या पुणे शहराला आता साडेअठरा टीएमसी पाणी लागत आहे. जवळपास दोन लाख एकराला बारा महिने पुरेल एवढे पाणी पुणेकरांना देण्यात येत आहे. त्यात उपकार करत नाही ती शहराची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यावर पुण्याचे आठ आमदार, पंचायती समितीचे प्रतिनिधी सगळे मिळून बैठक घेणार आहोत. कोणताही राजकीय मतभेद निर्माण न करता शहरातील सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. 

Web Title: Pune has state coffers so no need to worry: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.