शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

Pune Heavy Rain: पुण्यात हाहाकार! घरांमध्ये पाणी; जनावरे दगावली, जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस ठरला

By श्रीकिशन काळे | Published: July 25, 2024 5:33 PM

ढगफुटीसारखा पाऊस झालेला नसला तरी, संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले, नदी, ओढे, नाले भरून वाहू लागले

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. पण बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत केले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये कमरेइतके पाणी साठले. त्यात अडकलेल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. बुधवारी रात्रीपासून शहरात ११४ मिमी पावसाची नोंद झाली. हा जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस ठरला. तर ‘आयएमडी’च्या नोंदीमधील हा उच्चांकी दहावा पाऊस झाला आहे. वारजे येथील एका गोठ्यातील १४ जनावरे या पावसात दगावल्याची दुदैवी घटनाही घडली.

यंदा भारतीय हवामान विभागानूसार जून व जुलै महिन्यात पावसाचा खंड असल्याचे सांगण्यात आले होते. जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली, त्यानंतर जुलैच्या मध्यानंतर मात्र चांगलाच बरसू लागला. गेल्या दोन दिवसांपासून तर पुणे शहर व घाटमाथ्यावर संततधार ते जोरदार पाऊस होत आहे. गेल्या आठवड्यात धरणसाठाही कमीच होता. पण दोन दिवसांतील पावसाने धरणेही भरून गेली. ढगफुटीसारखा पाऊस झालेला नसला तरी, संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले, नदी, ओढे, नाले भरून वाहू लागले. खडकवासला धरणातूनही विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे शहरातील प्रसिध्द असणारा भिडे पूलही पाण्याखाली गेला. जून महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस

यंदा एका दिवसात शंभर मिमीहून अधिक पावसाची नोंद दोन दिवसांमध्ये झाली आहे. ९ जून २०२४ रोजी तब्बल ११७ मिमी पाऊस पडला, तर गुरूवारी सकाळपर्यंत ११४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनूसार गुरूवारचा पाऊस हा आतापर्यंतचा दहावा उच्चांकी ठरला आहे. हवामान विभागाकडे १८८९ पासूनच्या नोंदी आहेत.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणTemperatureतापमानWaterपाणीNatureनिसर्ग