शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

Pune: बारामतीच्या पतसंस्थेत तब्बल सव्वा दोन कोटींचा अपहार, चेअरमनसह तीन जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 9:32 PM

Pune News: सहकारी पतसंस्थेत अधिकाराचा दुरुपयोग करत बोगस कागदपत्रांद्वारे ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारून तब्बल २ कोटी १८ लाख ७७ हजार २७५ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे चेअरमनसह तीन जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ.

सांगवी - सहकारी पतसंस्थेत अधिकाराचा दुरुपयोग करत बोगस कागदपत्रांद्वारे ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारून तब्बल २ कोटी १८ लाख ७७ हजार २७५ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे चेअरमनसह तीन जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ. शाकंबरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. असे अपहार झालेल्या पतसंस्थेचे नाव आहॆ.

याबाबत सुनिल मथुरा काळे (वय ५४) रा. वडगाव ता. करमाळा, जि. सोलापुर),व्यवसाय नोकरी (विशेष लेखापरीक्षक वर्ग-२, सहकारी संस्था, बारामती, ता. बारामती, जि. पुणे), यांनी फिर्याद दिली आहॆ.

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिलेल्या माहिती नुसार शाकंबरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चे तत्कालिन सचिव अनिल बबनराव गलांडे (रा. शांभवी, अशोकनगर, बारामती ता. बारामती जि. पुणे), मुकुंद महादेव गिजरे मु.पो. सातव गल्ली, कसबा, बारामती ता. बारामती जि. पुणे), श्रीमती मंजुश्री विठ्ठल दुगम (रा. गोकुळवाडी, कचेरी रोड बारामती ता. बारामती जि.पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहॆ.

(दि. १ एप्रिल २०१० रोजी ते दि. ३१ मार्च २०२२) या कालावधित बारामतीत हा प्रकार घडला आहॆ. शाकंबरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ता. बारामती या संस्थेचे तात्कालीन चेअरमन अनिल बबनराव गलांडे, तात्कालीन सचिन मुकुंद महादेव गिजरे व श्रीमती मंजुश्री विठ्ठल दुगम यांनी शाकंबरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बारामती या पतसंस्थेचे कर्ज व्यवहारामध्ये गैरव्यवहार करुन रक्कम दोन कोटी अठरा लाख सत्त्यात्तर हजार दोनशे पंच्चाहात्तर फक्त या रकमेचा गैरव्यवहार अपाहार करुन सर्वांनी कट रचुन खोटी व बनावट कर्ज प्रकरणे तयार करुन, कर्ज खतावणी मध्ये चुकीच्या नोंदी नोंदवुन सहकारी कायदा, कानुन व पोट नियमांचे उल्लंघन करुन विना तारण कर्ज देवुन तसेच अपुरे कागपत्राचे आधारे तारणी कर्ज वाटप करुन संस्थेची व ठेवीदारांची फसवणुक करून स्वताच्या पदाचा गैरवापर करुन संगनमताने विश्वासघात करुन फसवणुक केली आहे.

सदर विनिर्दिष्ट अहवालानुसार  सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(5) (ब) मधील तरतूदी नुसार सदर संस्थेमधील गैरव्यवहारास जबाबदार असणा-या तत्कालीन चेअरमनसह  तीन आरोपी विरुध्द शासनाच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल केला आहॆ. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीbankबँक