पुणे : रॉकी माऊंटन इन्स्टिट्यूट व निती आयोग यांनी सन २०१७ मध्ये संयुक्तपणे आयोजित केलेल्या चलनवलन विकास संदभार्तील चँलेज या उपक्रमात पुणे शहराची भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून निवड झाली. पुण्याचे प्रशासन, सुव्यवस्थाविषयक नेतृत्व, शहरी चलनवलनासंबधी दिसणारी कार्यशिलता व स्मार्ट शहर चळवळ या निकषांवर पुणे शहराची यात निवड करण्यात आली आहे.रॉकी माऊंटन चे व्यवस्थापकीय संचालक जेम्स ल्युकोंब यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांनी पत्र पाठवून याची माहिती दिली. नागरी समस्यांवर नवीन उपाय हेरणे, ते राबवणे व त्या माध्यमातून सुसंगत व वेगवान असा नव्या चलनवलन प्रकल्पांचा एक आलेख तयार करणे यासाठी पुणे शहर आता एक संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाईल व देशातील इतर शहरांना ते मार्गदर्शन करेल. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याला पहिली चलनवलन प्रयोगशाळा घेण्याचा मान मिळाला आहे. आॅगस्ट २०१८ मध्ये यात एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यात देशातील तसेच शहरांमधील अनेक समस्यांवर मात करण्यासाठी चर्चासत्र होणार असून त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
पुणे भारतातील पहिले दीपस्तंभ शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 8:52 PM
पुणे शहर आता एक संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाईल व देशातील इतर शहरांना ते मार्गदर्शन करणार आहे.
ठळक मुद्देनिती आयोगाकडून निवड: शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा पुण्याला पहिली चलनवलन प्रयोगशाळा घेण्याचा मान