सर्वसाधारण गटात खेडमधील दत्तू कडलक (तिफनवाडी) व आदिवासी गटात अंकुश भवारी ( आंबेगाव) यांंनी गहू पीक उत्पादनात राज्यात पहिला क्रमांक मिळवला. विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे आहेत. विजेत्यांची नावे कृषी विभागाने नुकतीच घोषित केली.
तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर सर्व पिकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रत्येकी ३ क्रमांक काढण्यात आले. यात पिकाचे हेक्टरी उत्पादन लक्षात घेतले गेले. पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा घेतली जात असल्याचे जिल्हा कृषी तंत्र अधिकारी वर्षा यादव यांनी सांगितले.
चौकट
विजेते शेतकरी
राज्यस्तरीय- सुमन जगताप (इंदापूर), दिलीप नाईकरे (खेड), दामू मावळे (आंबेगाव)
विभागीय - शिवाजी जगताप (इंदापूर), शरद सांगाडे, रामू रेगडे, सीताराम ढवळे (तिघेही जुन्नर)
जिल्हा - नंदा देवकर, दिलीप कडवळे, शिवप्रसाद थोरात (सर्व इंदापूर), छाया पवार, पांडुरंग कोकरे, राजेंद्र पोगण, अशोक तावरे, भाऊसाहेब बागल, हेमंत भगत (सर्व बारामती), नामदेव असवले, नारायण पारधी, नारायण गोहरे (सर्व आंबेगाव).