Pune Lockdown : पुणे शहरातील सर्व प्रकारची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत राहणार सुरु; व्यापारी वर्गाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 07:00 PM2021-05-31T19:00:06+5:302021-05-31T19:40:35+5:30
पुणे महापालिकेची नवीन नियमावली जाहीर.....
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने व ४० टक्क्यांपेक्षा अधिक बेड विविध रूग्णांलयांमध्ये उपलब्ध असल्याने, रविवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज (सोमवारी) महापालिकेनेही पुणे शहरातील निर्बंध शिथिल केले आहेत़ यामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह (अत्यावश्यक सेवा) इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास परवागनी दिली आहे. मात्र शनिवारी, रविवारी केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाने जाहिर केल्याप्रमाणे, पुणे शहरासाठी लॉकडाऊन शिथिल करतानाची नवीन नियमावली महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज जाहिर केली. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाच्या दिवशी सुरू राहतील. तर ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक सेवा व वस्तू तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांचीही घरपोच सेवा सुरू करण्यास परवागनी देण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे शहरात किराणा, भाजीपाला, मेडिकल, दुधविक्री आदी अत्यावश्यक सेवांसह, कपडे, स्टेशनरी, संगणक विक्री, सोने-चांदी आदी इतर सर्व व्यवसायांना आपले व्यवसाय सुरू ठेवण्यास मर्यादित कालावधीकरिता मान्यता मिळाली आहे़.
नवीन आदेश हे पुढील दहा दिवसांसाठी असणार आहे. संसर्ग वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लावणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेचे नवीन आदेश पुढीलप्रमाणे:
* पुणे शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी.
* बँकांचे कामकाज सूरु राहणार.
* अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार.
* रेस्टॉरंट आणि बार हे फक्त पार्सल आणि घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
* ई- कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच इतर वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मुभा
* शहरात दुपारी ३ नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण ,सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी.
*महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त) २५ टक्के अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
* कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्याच्याशी निगडित देखभाल व दुरुस्ती सेवा ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार.
* मद्याविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार
हे राहणार बंद
सिनेमागृह, नाट्यगृह, ओडिटोरिम, मनोरंजन पार्क, अम्युजमेंट पार्क, जिम, जलतरण तलाव, क्रीडा संकुल
* चित्रपट, मालिका, जाहिरातींचे शूटिंग बंद
* उद्याने, मोकळ्या जागा, मैदाने बंद रहाणार
* सर्व प्रकारची धार्मिक स्थळे
*पालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
* सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, आंदोलने
* मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आठवडी बाजार बंद राहणार
* लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ यावरील निर्बंध कायम