पुणे : पुणे शहर,पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंतच्या एकूण 10 दिवसांच्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी ( दि.१०) केली आहे. त्यात पहिले पाच दिवस अत्यंत कडक स्वरूपाचा लॉकडाऊन असेल. त्यात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे. नवीन लॉकडाऊनची नियमावली उद्या सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर म्हणाले, गेल्या काही दिवसांत पुण्यात कोरोनाची संख्या खूप झपाटयाने वाढते आहे. त्यामुळे कोरोना साखळीला ब्रेक लावण्यासाठी हा लॉकडाऊन असेल तसेच या कालावधीत आरोग्य विभागाला कोरोनाविरुद्ध सक्षम वैद्यकीय यंत्रणा निर्माण करण्यासाठी वेळ मिळणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांना ऑनलाईन पासेस पोलिस आयुक्त उपलब्ध करून देणार आहे. दुध ,औषधांची दुकाने सुरू राहनअशास्कीय कार्यालय, सविस्तर आदेश निर्गमित होतील. नवल किशोर राम म्हणाले, पुणे जिल्हा लॉकडाऊन जाहीरच आहे. परंतु, आपण काही सवलती दिल्या होत्या. मात्र नागरिकांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले. म्हणून सर्वानुमते लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात पूर्वीसारखेच बंधने असणार आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन योग्य ठरेल. मात्र लगेच रुग्णवाढ रोखली जाणार नाही. लॉकडाऊनचा परिणाम दिसण्यासाठी काही दिवस लागणार आहे..
शेखर गायकवाड यांनी सांगितले की, 13 च्या मध्यरात्री लॉकडाऊन अंमलबाजावणीस सुरुवात होईल.त्याआधी नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळातील आपली जीवनावश्यक वस्तूंची तयारी करून घ्यावी..या तयारीसाठी 3 दिवसांचा अवधी दिला आहे. पहिले पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे.त्यासंबंधीची नियमावली महापालिका उद्या जाहीर करेल..
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रावण हर्डीकर म्हणाले; कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी हा लॉकडाऊन कोरोना टेस्ट वाढणावण्यावर भर , सांशीयत व्यक्तींचा शोध, पहिल्या लॉकडाऊन मध्ये सवलती दिलेल्या उद्योगांसाठीच लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे.
-