पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी पुण्यात आज रात्री आठ वाजल्यापासून होणार असून सोमवारी सकाळी ७ पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत पुणेकरांनी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. पुण्यात नेमका कसा असणार विकेंड लॉकडाऊन जाणून घ्या सविस्तर...
राज्य सरकारच्या नियमावलीच्या आधारे आता पुणे महापालिकेने शहरात नव्याने निर्बंध लागू केले आहे.त्यानुसार शहरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत सर्व सुरू राहणार असल्याचे आदेश देण्यात आले आहे. यात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याचबरोबर शुक्रवारी रात्री ८वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७पर्यंत कडक लॉक डाऊनची अंमलबजावणी होणार आहे.याच धर्तीवर पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात मागील शनिवारपासून (दि. ३) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसभर जमावबंदी सुरु आहे. हाॅटेल, बार, माॅल, धार्मिक स्थळे बंद आहेत. तसेच पीएमपी बससेवा बंद आहे.
......
...अन्यथा ही कडक कारवाई होऊ शकते..!
पुणे शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असताना,महापालिका, जिल्हा , पोलीस प्रशासनाने काहो कठोर पावले उचलली आहे.त्याचाच भाग म्हणून शहरात आज रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉक डाऊन असणार आहे. या कालावधीत अत्यंत मोजक्या लोकांना या सवलती असणार आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.नाहीतर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सोबतच गुन्हे दाखल, वाहन जप्तीसारख्या कडक कारवाई पण करण्यात येणार आहे. रवींद्र शिसवे, सहपोलिसआयुक्त,पुणे
पुणे विकेंड लॉकडाऊन नियमावली:
*पुण्यात या सेवा राहणार सुरू*- लसीकरण सुरू- पालिका क्षेत्रातील खानावळी,पार्सल मेस सकाळी 7 ते संध्याकाळी 8 सुरू-कोणत्याही परीक्षा असल्यास विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी परवानगी - मेडिकल व औषध विकी- दूध विक्री सकाळी 6 ते 11- ऑनलाइन पुरवठा कंपन्या सुरू -घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणारे मदतनीस, नर्स यांना परवानगी केवळ सकाळी 7 ते 10- बांधकाम ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना काम सुरू ठेवता येणार
*पुण्यात या सेवा बंद*- मद्य विक्री बंद- चष्मा दुकाने बंद - सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळता बंद- ओला उबेर टॅक्सी सेवा अत्यावश्यक कारणांसाठी सुरू