शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

Pune Lockdown : पुण्यात अनलॉक? पालकमंत्री अजित पवारांनी दिले संकेत; सोमवारी होणार निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 8:59 PM

तसेच पुणे ग्रामीणमध्ये सूट दिली जाणार नसल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले.

पुणे : लॉकडाऊनच्या बाबतीत शिथिलता देण्याचा निर्णय ज्या भागात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या आत आहे त्यासाठी असणार आहे. काल समज- गैरसमज झाले. थोड्या वेगळ्या बातम्या आल्या. पण उद्धव ठाकरे यांचाच निर्णय अंतिम राहणार आहे. तसेच पुणे शहरात पॉझिटिव्हीटी रेट ५ पर्यंत आला आहे. त्यामुळे सोमवारपासून पुणे, पिंपरी चिंचवडबाबत वेगळे धोरण अवलंबिले जाणार आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे पुण्यात अनलॉकची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता आहे. 

पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला लोकप्रतिनिधी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले. पुणे ग्रामीणमध्ये सूट दिली जाणार नाही कारण नाही तिथे पॅाझिटिव्हिटी रेट अद्यापही जास्त आहे. गाईडलाईनप्रमाणे काम सुरु आहे. हेे सातत्य टिकले पाहिजे, यात कुचराई होउ नये. पुण्यात ब्लॅक फंगससाठी मोठी बिलं येत होती. सरकारी हॅास्पिटलमध्ये बिलं काय लावायची याचे आदेश काढलेले आहेत. खासगी रुग्णालय वाल्यांनी २० -२२ लाख बिलं लावली आहेत. मात्र, याबाबत मुख्यमंत्र्यांनी काढलेले आदेश स्पष्ट दिले आहेत. तिन्ही प्रकारच्या बेडची उपलब्धता सगळीकडे आहे.

पुढे पवार म्हणाले, ब्लॅक फंगसच्या औषधाची अजून कमतरता आहे. पुण्याला खडकी आणि पुणे कॅन्टॅानमेंट पुणे शहरात धरले जात नाहीत. पुणे शहराची नियमावली या कॅन्टॅानॅमेंटला लावावी लागणार आहे. देहुला १०% पॅाझिटिव्हीटी त्यामुळे तिथे दिलासा नाही. रोजची आकडेवारी पाहून सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे. 

वारकऱ्यांना समजवायचा प्रयत्न केला. त्यांनी समितीची मागणी केली. सौरभ राव आणि लोहिया यांच्या उपस्थितीमध्ये समिती नेमली आहे. वारकऱ्यांची मागणी वेगळा विचार करा. ते तीन चार दिवसांत रिपोर्ट देतील. वारकरी म्हणतात ५० लोक जाणार पण पालखी पुढे जाईल तसे लोक दर्शनाला येतील. समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दाखवणार ते अंतिम निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड