पुणे: पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली मात्र, काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवल्यामुळे काहीवेळ मतमोजणीला उशीर झाला. पहिल्या फेरीपासून बापट यांनी जोशीं यांच्यावर आघाडी घेतली होती.. ती कायम ठेवत पुण्याच्या विधानसभानिहाय मतमोजणीत आपला पारडे जाड करत काँग्रेसच्या समोरील चिंता वाढवली आहे. बापट यांनी तिसऱ्या फेरीअखेर जवळपास ४७ हजारांची आघाडी घेतली आहे. भाजपाने बापटांच्या रुपाने काँग्रेसच्या मोहन जोशींसमोर मोठे आव्हान उभे केले होते. रार्ष्टीय पातळीवरील मोठ्या नेत्यांची फौैज प्रचारसभांना आणण्यात काँग्रसला अपयश आले होते. ही लढत नागरिकांच्या मतानुसार एकमजमोजणीनंतर पुण्यात काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 2014पासून शत-प्रतिशत कमळ फुलले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्यात लोकसभेच्या जागेसाठी लढत बघायला मिळाली. वाहतूक, वाढते शहरीकरण, मेट्रो, पाणीप्रश्न अशा मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात आली. महापालिका आणि सर्व विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे राज्य असल्यामुळे बापट यांचे पारडे जड वाटत आहे. मात्र मोहन जोशी यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांनी प्रचारात दाखवलेला उत्साह काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देईल का, याबद्दल उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात तिसऱ्या फेरीअखेर बापट यांना87184 मते तर जोशी यांना 40741 मते मिळाली आहेत. बापट 46, 443 मतांनी आघाडीवर आहेत. फेरीनंतर गिरीश बापट यांनी ४६, ४४३ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना ८७१८४ मते मिळाली असून मोफान जोशी यांच्या पारड्यात ४०७४१ मते मिळाली आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी 5 लाख 69 हजार 825 मतांसह विजय साकारला होता. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांना 2 लाख 54 हजार 056 मते मिळाली होती. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने शिरोळे विजयी झाले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना एक लाख मतांच्या आत समाधान मानावे लागले होते.
पुणे लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : पुण्यात बापटांचा वरचष्मा, काँग्रेसची पीछेहाट...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:10 PM