पुणे लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : थोड्याच वेळात ठरणार, पुण्याचा नेता कोण होणार ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:01 AM2019-05-23T10:01:09+5:302019-05-23T10:04:24+5:30

#Pune Lok Sabha Election Results 2019) : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात मागील निवडणुकीपासून मारली आहे..

Pune Lok Sabha Election 2019 live result & winner:Girish Bapat VS Mohan Joshi Votes & Results | पुणे लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : थोड्याच वेळात ठरणार, पुण्याचा नेता कोण होणार ? 

पुणे लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : थोड्याच वेळात ठरणार, पुण्याचा नेता कोण होणार ? 

googlenewsNext

पुणे: काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 2014पासून शत-प्रतिशत कमळ फुलले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांच्यात लोकसभेच्या जागेसाठी लढत बघायला मिळाली. वाहतूक, वाढते शहरीकरण, मेट्रो, पाणीप्रश्न अशा मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात आली. महापालिका आणि सर्व विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे राज्य असल्यामुळे बापट यांचे पारडे जड वाटत आहे. मात्र मोहन जोशी यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांनी प्रचारात दाखवलेला उत्साह काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देईल का, याबद्दल उत्सुकता आहे. 
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी 5 लाख 69 हजार 825  मतांसह विजय साकारला होता. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांना 2 लाख 54 हजार 056 मते मिळाली होती. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने शिरोळे विजयी झाले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना एक लाख मतांच्या आत समाधान मानावे लागले होते.

Web Title: Pune Lok Sabha Election 2019 live result & winner:Girish Bapat VS Mohan Joshi Votes & Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.