पुणे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण. आयुष्यातल्या या महत्त्वाच्या दिवशी पुण्यतिक श्रद्धा भगत या तरुणीने लग्नाच्या विधींच्या आधी मतदान करत राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे.श्रद्धा भुगाव येथे अमित सातपुते यांच्याशी मंगळवारी( दि. २३) विवाह बंधनात अडकणार आहेत.मात्र, लग्नाआधी तिने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केले आणि मगच त्या विवाहस्थळी रवाना झाल्या.. लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यांत महाराष्ट्रातील चौदा जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. पुण्यात सकाळपासूनच नागरिकांकडून मतदानाचा हक्क बजावणयासाठी शहरातील विविध मतदान केंद्रावर गर्दी केली जात आहे. मंगळवारी श्रध्दा या विवाह बंधनात अडकणार आहे. मात्र, त्याआधी त्यांनी मतदान केंद्रावर नऊवारी साडी, हिरवा चुडा, मुंडावळ्या अशा वेषात येत सर्वांचे लक्ष वेधून नूमवी प्रशालेत मतदान केले. बी.एस्सी. इतके शिक्षण घेतलेल्या श्रद्धा हिने यावेळी लोकमतशी बोलताना सांगितले की, मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.ते प्रत्येकाने बजावायला हवे. आज माज्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस असला तरी देशाच्या दृष्टीनेही हा भविष्य ठरवणारा दिवस आहे. त्यामुळे मी लग्नापूर्वी माझा हक्क बजावण्याचा निर्णय घेतला.माझे आई वडील आणि कुटुंबाने मला यात साथ देत त्यानुसार नियोजन केले.मी सर्वांना हेच आवाहन करेन की, काहीही झालं तरी मतदान करायला विसरू नका.आपला हक्क आवर्जून बजावा.
पुणे लोकसभा निवडणूक : आधी लगीन लोकशाहीचे : पुण्यातील श्रद्धा भगतचे लग्नापूर्वी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 10:39 AM