पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार गिरीष बापट यांनी सहाव्या फेरी अखेर ९५ हजार ३२० मतांनी आघाडी घेतली आहे. ईव्हीएम मशीनबाबत झालेल्या गोंधळामुळे पुणे मतदारसंघाची मतमोजणी संथगतीने सुरू आहे. पुण्याचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सहाव्या फेरीअखेर भाजपाचे गिरीष बापट यांना १ लाख ७८ हजार २४८ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना ८२ हजार ३२० मते मिळाली आहेत. वंचित विकास आघाडीच्या अनिल जाधव यांना २९ हजार ३२८ मते मिळाली आहेत. पहिल्या सहा फेºयांमध्येच बापट यांनी मोठे मताधिक्क्य मिळवले आहे, त्याचबरोबर वंचितच्या अनिल जाधव यांनीही अपेक्षेपेक्षा चांगली मते मिळवली आहेत.
महापालिका आणि सर्व विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचे राज्य असल्यामुळे बापट यांचे पारडे जड वाटत आहे. मात्र मोहन जोशी यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांनी प्रचारात दाखवलेला उत्साह काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देईल का, याबद्दल उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात सहाव्या फेरीनंतर गिरीष बापट यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १ लाख ७८ हजार २४८ मते मिळाली असून मोहन जोशी यांच्या पारड्यात ८२ हजार ३२० मते मिळाली आहेत.
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी 5 लाख 69 हजार 825 मतांसह विजय साकारला होता. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांना 2 लाख 54 हजार 056 मते मिळाली होती. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक मतांच्या फरकाने शिरोळे विजयी झाले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना एक लाख मतांच्या आत समाधान मानावे लागले होते.