शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला, पण आता..."; शरद पवारांचे मोठं विधान
2
अभिमानास्पद! गडचिरोलीचा बोधी रामटेके संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘ग्रॅज्युएट स्टडी प्राेग्राम’मध्ये!
3
दुर्दैवी! सुरतची लक्झरी बस सापुतारा घाटात कोसळली; दोन जण मृत्यूमुखी, पाच गंभीर जखमी
4
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे सोमवारी सुट्टी; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
5
वाहतूक कोंडीमुळे मंत्री, आमदारांचे ‘वंदे भारत’; नाशिक- मुंबई रोडची दुरवस्था
6
लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेतले; इंटरनेट कॅफेच्या चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
7
छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुली नागपुरमध्ये ताब्यात
8
कुंडई औद्योगिक वसाहतीत संरक्षक भिंत कोसळल्याने तीन कामगार ठार, एक किरकोळ जखमी
9
'लाडकी बहीण' समितीत तालुका सचिव पदासाठी तहसीलदारांचे हात वर; कामाचा व्याप जास्त
10
मिहान परिसरात कनेक्टिव्हिटी वाढवणे, वाहतूक सुविधा सुधारण्याकरिता १५ जुलैपासून ई-बस सेवा
11
राज्याच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष केंद्रित; विदर्भ, मराठवाड्यात उद्योगांच्या समस्या सोडविणार!
12
RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ!
13
कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू, अनेक भाविक जखमी
15
"आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा ठराव विधिमंडळात घ्या अन् लोकसभेत पाठवा, आम्ही पाठिंबा देतो"
16
ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला
17
"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान
18
भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसला मतदान केले, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
19
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकरी बांधवांसोबत साधला संवाद
20
कोणती अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची बातमी येईल; 'चॅम्पियन' खेळाडू नव्या इनिंगसाठी सज्ज

Pune Lok Sabha Result 2024: पुण्यात मुरलीधर मोहोळ तब्बल ४६ हजार मतांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 1:41 PM

Pune Lok Sabha Result 2024रवींद्र धंगेकराना आघाडी घेण्यासाठी ४५ हजारांपेक्षा जास्त मत मिळवावी लागणार

Pune Lok Sabha Result 2024:  देशभरात निवडणूक निकालाची उत्सुकता लागली असून, पुणे जिल्ह्यात देखील ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने अंतिम फेरीनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.  चार फेऱ्यानंतर पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांनी (Murlidhar Mohol) २७ हजार ५९८ ची आघाडी घेतली होती. मोहोळांनी धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) कसबा मतदारसंघातून ५ हजार १३१ मतांची आघाडी घेतली होती. आतापर्यंत कसबा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना १७ हजार ७५१ मते तर रवींद्र धंगेकरांना १२ हजार ६२० मते मिळाली. तर पाचव्या फेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ ३४ हजार ८५१ मतांनी पुढे होते. या फेरीअखेरीस रविंद्र धंगेकर यांना १ लाख ११ हजार ८८९ मते मिळाली तर मोहोळ यांना १ लाख ४५ हजार ७४० मते मिळाली होते. आता सहाव्या फेरीअखेर मुरलीधर मोहोळ ३७ हजार ६९३ ने आघाडीवर आहेत.  सातव्या फेरीनंतर मोहोळ यांना ४५ हजार ४१९ च्या फरकाने पुढे आहेत. तर आता आठव्या फेरीनंतर मुरलीधर मोहोळ हे तब्बल ४६  हजार ४६९ मतांनी आघाडीवर आहेत. 

सातव्या फेरीत मिळालेले मतदान 

वडगाव शेरी - धंगेकर - ४९३७  - मोहोळ - ५२११शिवाजीनगर -२७४४  - ३७०८कोथरुड - ४२२०- ५९२५पर्वती - ४७०९- ५२६७ कॅन्टोनेंंट - ४८०४ - ३८९७कसबा - २६२७ - ५९३४एकूण. -  २४०५१ -  ३०९४२मोहोळ यांची एकूण आघाडी - ६८९१ (एकूण ४५४१९)

आठवी फेरीत मिळालेले मतदान 

वडगाव शेरी - धंगेकर - ४८७५  - मोहोळ - २९१५शिवाजीनगर -२६३६  - १६६०कोथरुड - ४५७४- ५२६५पर्वती - ३२९८- ६००६ कॅन्टोनेंंट - २९५५ - ४६२९कसबा - ४८९२ - ३५०५एकूण. -  २२९३० -  २३९८०मोहोळ यांची एकूण आघाडी - १०५० (एकूण ४६४६९)

पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात वडगाव शेरी २ लाख ४१ हजार ८१७, शिवाजीनगर १ लाख ४१ हजार ११३, कोथरूड २ लाख १७ हजार ४५५, पर्वती १ लाख ८९ हजार १८४, पुणे कॅन्टोन्मेंट १ लाख ४९ हजार ९८४, तर कसबा मतदारसंघात १ लाख ६४ हजार १०५ मतदान झाले आहे.

यंदा ६८ हजार ४२२ मतदान अधिक-

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत १० लाख ३५ हजार २३६ नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले हाेते. यंदा ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा ६८ हजार ४२२ अधिक मतदान झाले आहे.

देशभरात निवडणूक निकालाची उत्सुकता लागली असून, पुणे जिल्ह्यात देखील ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाल्यानंतर दुपारी अडीचपर्यंत निकाल हाती येणार आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने अंतिम फेरीनंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी (दि.४) होणार आहे. पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे, तर शिरुर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव (ता. शिरुर) येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामात आणि मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpune-pcपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळBJPभाजपाbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४