पुणे : पुणे-लोणावळा मार्गावर धावणा-या लोकलमधील प्रवाशाला लुटणा-या तीन आरोपींना लोहमार्ग न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. टी. सहारे यांनी अडीच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवस तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.प्रमोद विलास अमराळे (वय २८), ऋषभ विजय कासाळे (वय २३) आणि बादल बगिराम गोरखा (वय २७) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. ही घटना ५ जुलै २०१३ रोजी मध्यरात्री १२.३० ते १.१५ या कालावधी पुणे-लोणावळा लोकलमध्ये कासारवाडी ते दापोडी रेल्वे स्टेशनच्यादरम्यान घडली.राजेंद्र माळी (रा. कारेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लोकलमधून लोणावळा ते पुणे प्रवास करत होते. त्या वेळी सर्व आरोपी तिथे गेले. त्यांनी माळी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांची ब्रिफकेस हिसकावली. तीच त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडील दोन मोबाईल, रोख रक्कम आणि दागिन्यांसह असा ५५ हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले.याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील शीला खडके यांनी काम पाहिले.अश्लील चित्रफीत; आरोपीला कोठडीपुणे : अल्पवयीन मुलीची अंघोळ करताना अश्लील चित्रफीत तयार करून ती दुसºयांच्या मोबाईलवर प्रसारित करणाºया दोन आरोपींना खडकी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपींना पोलीस कोठडी दिली.संंजय विकास तुपे ऊर्फ नन्या आणि सनी विजय दुबळे (दोघेही वय १९, रा. सुरती मोहल्ला, खडकी) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १६ वर्षांच्या पीडित मुलीच्या वतीने तिच्या नातेवाईक तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्या दोघांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारहाणप्रकरणी तिघांना कोठडीपुणे : जुन्या भांडणाचा वाद उपस्थित करत हॉकी स्टिकने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी तिघा जणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली.शाफीन शौकत खान (वय १९, रा. खराडी), विकीकुमार जनक मंडल (वय २०, रा. वडगाव शेरी), शिवकुमार रसपाल सिंग (वय २२, रा. खराडी) असे पोलीस कोठडी दिलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. अविनाश प्रकाश यादव (वय २७) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते १६ जानेवारी २०१८ रोजी रात्री ९ वाजता अविनाश यादव त्यांच्या दुचाकीवरून खराडी येथील अनुसया इंग्लिश मीडियम येथून चालले होते. याप्रकरणी विकास प्रकाश यादव (वय २४, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे-लोणावळा लोकल लूटमारप्रकरणी तिघांना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:17 AM