लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पुणे महापालिकेत आस्थापनेवर कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांमधून अभियांत्रिकी संवर्गात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज परीक्षा घेण्याची तयारी केली होती. मात्र याविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ही परिक्षा पुढे ढकलण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने आज होणारी परिक्षा पुढे ढकलली आहे.
पालिकेच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता , उप अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्याला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना २५ टक्का ऐवजी १५ टक्के पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर ७५ टक्काच्या ऐवजी ८५ टक्के सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.
त्यासाठी नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने आज परीक्षा घेण्याची तयारी केली होती. मात्र याविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ही परिक्षा पुढे ढकलण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने आज होणारी परिक्षा पुढे ढकलली आहे. या परिक्षेची पुढील तारीख न्यायालयाच्या निर्णया नंतर ठरवली जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.