पुणे- पुण्यातील एका व्यक्तीनं एलियन दिसल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाला तशा आशयाचा एक मेलही पाठवला आहे. त्या व्यक्तीनं पीएमओला पाठवलेल्या मेलनं पुणे पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी आता त्या व्यक्तीचा शोध घेतला असून, तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं समोर आलं आहे.सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पुण्यातील कोथरुडमध्ये वास्तव्याला असलेल्या एका व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाला एक इमेल पाठवला. त्याला स्वतःच्या घराच्या बाहेर एलियन दिसल्याचा दावा त्यानं इमेलमध्ये केला आहे. पंतप्रधान कार्यालयानं हा इमेल महाराष्ट्र सरकारला पाठवला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी पुणे पोलिसांकडे सोपवली आहे.पुणे पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला असून, इमेल पाठवणारा 47 वर्षीय व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचं तपासात आढळलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी त्या व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाला होता, त्यानंतर त्याचं मानसिक संतुलन ढासळलं. त्यानं घराबाहेर वीज पाहिली आणि त्याला ते एलियश असल्याचा भास झाला. विशेष म्हणजे त्या व्यक्तीनं थेट पीएमओला मेल केला होता आणि त्याची कल्पना घरच्यांनाही दिली नाही.
जाssदू... पुण्यात एकाला दिसला एलियन, पोलिसांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 9:27 AM
पुण्यातील एका व्यक्ती एलियन दिसल्याचा दावा करत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देपुण्यातील एका व्यक्तीनं एलियन दिसल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीनं पंतप्रधान कार्यालयाला तशा आशयाचा एक मेलही पाठवला आहे.इमेल पाठवणारा 47 वर्षीय व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचं तपासात आढळलं आहे.