पुणे : पुणे बाजार समितीत अन्य राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होत असल्याने पुणे बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्याचा आला आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या मॉडेल अॅक्ट आणि ई ट्रेडींगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असून आहे. या निर्णयामुळे या बाजार समित्यांना निवडणुकीतून वगळण्यात आले आहे.शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी यापूर्वीपासून केल्या जात होत्या. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत गैरप्रकार दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मॉडेल अॅक्ट तयार केला आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने हा अॅक्ट राज्य सरकारकडे अंमलबजावणीसाठी पाठविला होता. प्रशासकीय मंडळात २३ जणांचा समावेशदरम्यान, राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर बाजार समित्यांवर प्रशासकीय मंडळात सुमारे २३ जणांचा समावेश असण्याची शक्यता. हे प्रशासकीय मंडळ आयएएस अधिका-याच्या अध्यक्षेताखाली विंष्ठवा कृषी अथवा पणन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली नेमण्याचा प्रस्ताव आहे. तो अंतिम व्हायचा आहे.
पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 2:51 AM