पुणे: जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी (दि.१३) मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.
कुषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथील मार्केटयार्ड फळबाजार, गुळ- भूसार बाजार, केळी बाजार , फळे व पाजीपाला विभाग तसेच मोशी , खडकी, मांजरी, उत्तमनगर उपबाजार बंद असून मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार (दि.१३) मे रोजी बंद राहतील. पुणे, शिरूर, मावळ या भागातील मतदारांना मतदान दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता बंद ठेवण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले.