शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

Pune Mayor Corona Positive: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 1:44 PM

माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन मोहोळ यांनी केले

पुणे : देशात तिसऱ्या लाटेत अनके जणांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. या लाटेतील विषाणू घातक नसला तरी तो वेगाने पसरू लागला आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही पुन्हा कोरोना होऊ लागला आहे. दोन डोस घेतल्यामुळे सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यातच पुण्यातही १ जानेवारीपासून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. त्यातच आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. लक्षणे जाणवत असल्याने टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे. 

महापौर म्हणाले, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेन. अशी माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना झाला होता. त्यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेतले होते. आता पुन्हा त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचे त्यांनी टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

टॅग्स :Mayorमहापौरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल