'पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच; पुण्यासोबत दुजाभाव का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:34 PM2021-08-03T14:34:12+5:302021-08-03T14:53:53+5:30

Pune Corona: 'कोरोना नियम शिथिल करण्यावरून राज्य सरकारमध्ये मतभेद'

Pune Mayor Murlidhar Mohol slams Maharashtra Govt on Corona Ristriction in Pune | 'पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच; पुण्यासोबत दुजाभाव का?'

'पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच; पुण्यासोबत दुजाभाव का?'

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचाची महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती.

पुणे: कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारनं सोमवारी राज्यातल्या 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांना शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. तर 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. यावरुन आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या नियमानुसार 25 जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबईचे नाव आहे पण पुण्याचे नाही. यावरुन मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये दुजाभाव का? असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. तसेच, पुण्याबाबत पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली.

पुण्यासोबत दुजाभाव ?
दरम्यान, कोरोना निर्बंधांवरुन पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारनं पुण्यातले निर्बंध हटवावेत अशी व्यापाऱ्यांची आग्रही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध हटवण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातले निर्बंधही हटवले जातील, अशी या व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. आता राज्य सरकारच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम
राज्यातील 11 जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर या जिल्ह्यांच्या समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. 

Read in English

Web Title: Pune Mayor Murlidhar Mohol slams Maharashtra Govt on Corona Ristriction in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.