पुणे: घरबसल्या मेट्रोचे बुकिंग (pune metro ticket booking) करणारे मेट्रो ॲप (metro app) आतापर्यंत २७ हजार जणांनी डाऊनलोड करून घेतले आहे. अवघ्या ८ दिवसात मेट्रोला २ लाख २७ हजार ९५० प्रवासी मिळाले. त्यांच्याकडून मेट्रोला ३२ लाख ४५ हजार ६७३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
रविवारी सुटीच्या दिवशी (दि. १३) मेट्रोमधून ६७३५० नागरिकांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला लाखोंचे उत्पन्न मिळाले. मेट्रोला नागरिकांचा पुणे व पिंपरी - चिंचवड अशा दोन्ही शहरांमध्ये वाढता प्रतिसाद आहे.
पुण्यात वनाज ते गरवारे व पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी ते फुगेवाडी या मार्गांवर शालेय मुलांपासून ते वृद्ध व्यक्ती तसेच समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक मेट्रो सफारीचा आनंद लुटत आहेत. मेट्रोचे पुढील मार्ग काम पूर्ण होऊन त्वरित सुरू व्हावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.