PUNE MIDC FIRE: आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 09:09 PM2021-06-07T21:09:24+5:302021-06-07T21:09:24+5:30

PUNE MIDC : सॅनिटाझर तयार करणाऱ्या कंपनीला लागली होती आग. अनेकांचा आगीत होरपळून झाला होता मृत्यू, चौकशीचे आदेश.

PUNE MIDC FIRE Rs 5 lakh aid announced to relatives of fire victims Deputy Chief Minister | PUNE MIDC FIRE: आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

PUNE MIDC FIRE: आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर; उपमुख्यमंत्र्यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकांचा आगीत होरपळून झाला होता मृत्यू, चौकशीचे आदेश.

पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथे एका सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून काही कर्मचाऱ्यांना यात होरपळून मृत्यू झाला. यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 

“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

“आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भत अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत," अशी माहितीही त्यांनी दिली.  



चौकशीचे आदेश

"जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Web Title: PUNE MIDC FIRE Rs 5 lakh aid announced to relatives of fire victims Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.