(स्टार १०११ डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील आमदारांचा सोशल मीडियावर दांडगा ‘जनसंपर्क’ असल्याचे पाहायला मिळत आहे. फेसबुक, टि्वटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर पुणे शहरातील आठ आमदारांमध्ये हडपसरचे आमदार चेतन तुपे यांचा सर्वाधिक डंका आहे. सर्वात कमी फॉलोअर्स पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांचे फेसबुकवर ९ हजार २, इन्स्टाग्रामवर २ हजार तर टि्वटरवर ९३५ आहेत.
पुण्यातील प्रत्येक आमदार मतदारांपर्यंत पाेहोचण्यासाठी किंवा संपर्कात राहण्यासाठी अनेक माध्यम वापरत आहेत. अनेक आमदार नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्कात राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, मंत्रालयात इतर कामे आणि दौरे सतत सुरू असल्याने बऱ्याचदा नियमित संपर्क राहत नाही. पुण्यातील आमदार त्यामुळे सर्वाधिक सोशल माध्यमांचा जास्त वापर करताना पाहायला मिळत आहे.
आमदारांमध्ये चेतन तुपे यांचे फेसबुकवर ५२ हजार २२५, इन्स्टाग्रामवर ३० हजार ६०० तर टि्वटरवर ६ हजार १०० असे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचे फेसबुकवर ५१ हजार ८६६, इन्स्टाग्रामवर १६ हजार ४०० तर टि्वटरवर ९ हजार, तिसऱ्या क्रमांकावर शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे फेसबुकवर ४३ हजार ७६९, इन्स्टाग्रामवर ५ हजार २०० तर टि्वटरवर ३७ हजार ३०० आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सर्वाधिक फॉलोअर्स
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे फेसबुकवर २ लाख ३१ हजार ७९, इन्स्टाग्रामवर २५ हजार १०० असे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. विशेषत: फॉलोअर्समध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचे संपूर्ण राज्यातील नागरिक जास्त संख्येने जोडले गेले आहेत. त्यामुळे पुण्यातील इतर आमदारांमध्ये त्यांचे फॉलोअर्स जास्त असल्याचे पाहायला मिळत आहेत.
-----
* शहरातील आमदार (कोणाला किती फॉलोअर)
१) कोथरूड - चंद्रकांत पाटील (अर्धा कॉलम फोटो)
फेसबुक - २,३१,०७९
ट्वीटर - २५,१००
२) हडपसर - चेतन तुपे (अर्धा कॉलम फोटो)
फेसबुक - ५२,२२५
ट्वीटर - ३०,६००
३) वडगावशेरी - सुनील टिंगरे (अर्धा कॉलम फोटो)
फेसबुक - ५१,८६६
ट्वीटर -१६,४००
४) शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे (अर्धा कॉलम फोटो)
फेसबुक - ४३,७६९
ट्वीटर - ५,२००
५) पर्वती - माधुरी मिसाळ (अर्धा कॉलम फोटो)
फेसबुक - ४१,५०१
ट्वीटर - ३,४००
६) कसबा - मुक्ता टिळक (अर्धा कॉलम फोटो)
फेसबुक - ३७,८५९
ट्वीटर - ६५६
७) खडकवासला - भीमराव तापकीर (अर्धा कॉलम फोटो)
फेसबुक - ९,४८८
ट्वीटर - १०००
८) पुणे कॅन्टोन्मेट - सुनील कांबळे (अर्धा कॉलम फोटो)
फेसबुक - ९,००२
ट्वीटर - २०००
-------
* फेसबुकवर सुनील कांबळे तळाला
पुण्यातील आठही आमदारांमध्ये सोशल मीडियावर सर्वात कमी सक्रिय असलेल्यांत पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांचा समावेश आहे. इतर आमदारांमध्ये त्यांना फेसबुकवर ९ हजार ०२, इन्स्टाग्रामवर २ हजार तर टि्वटरवर ९३५ असे सर्वात कमी फॉलोअर्स आहेत.