पुणे: मोहरम सणानिमित्त शहरातील काही मार्गांवर मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. २९ जुलै रोजी असणाऱ्या मोहरमनिमित्त मिरवणुकींदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून गरजेनुसार बदल केला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
मुख्य मिरवणूक श्रीनाथ टॉकिज येथून दुपारी तीनच्या सुमारास निघेल, त्यानंतर दत्त मंदिर - बेलबाग चौक - बुधवार चौक - जिजामाता चौक - डावीकडे वळून शनिवारवाडा येथील बुरूजास वळसा घालून शनिवारवाडा समोरील गाडीतळ पुतळा चौक - उजवीकडे वळून डेंगळे पूल - गाडीतळ चौक - डावीकडे वळून रेल्वे पुलाखालून आरटीओ चौक ते संगम ब्रीज येथील विसर्जन घाट येथे विसर्जित होईल. यासह लष्कर मिरवणूक, खडकी भागातून निघणारी मिरवणूक आणि इमामवाडा येथून निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यानचे रस्ते गरजेनुसार बंद अथवा वळवण्यात येणार आहेत.