पुणे - शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला गुरुवारी (27 सप्टेंबर) सकाळी मोठे भगदाड पडले. यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेल्याची त्याची नासाडी झाली आहे. तसेच जनता वसाहत परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसलं आहे. तर दांडेकर पूल परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंहगड रस्त्यावर दांडेकर पूल पाण्याखाली गेला असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे वाहतुकीचा रस्तादेखील बंद करावा लागला आहे. कालव्याचे पाणी सर्व्हे नंबर १३० झोपडपट्टीमध्ये शिरले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालिका तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद केला करण्यात आला आहे.
दांडेकर पूल, सिंहगड परिसरातून मुठा नदीचा उजवा कालवा जातो, याच कालव्याची भिंत कोसळली. पाणी घुसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणतीही आपत्कालीन सेवा अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही, यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, मुठा कालव्याची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असे पुणे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
- कालव्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे संसार गेले वाहून- मुठा नदी पात्रात वाहून गेलेले सामान बाहेर काढण्यासाठी नागरिकांची गर्दी- भिडे पूल, शास्त्री रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी