किवळे:पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील किवळे उड्डाणपुलाच्या वळणावर गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास मालमोटार उलटल्याने अपघात झाला. मालमोटार मुंबई येथून सातारा येथे अल्युमिनियम शीट घेऊन चालला होता. या अपघातात मालमोटारीचा चालक जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. विजय कुमार (वय अंदाजे ३५ रा वापी , मुंबई ) असे अपघातात जखमी झालेल्या मालमोटार चालकाचे नाव आहे.
अपघातस्थळी मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी मुंबई येथून अल्युमिनियम शीटस घेऊन मालमोटार (डीडी ०१ ई. ९८३९) सातारा परिसरात जात होती. द्रुतगती मार्गाने किवळे उड्डाणपूलावर किमी ९४/४०० जवळ आल्यानंतर उड्डाणपुलावरील तीव्र वळणावर मालमोटार पलटी होऊन डांबरी रस्त्यावर सुमारे ७५ ते १०० फूट घासत गेली असल्याचे दिसून आले.
अपघाताची माहिती मिळताच देहूरोड वाहतुक शाखेचे पोलीस आयआरबीचे महामार्ग वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अपघातस्थळी दाखल झाले होते.