पिंपरी:मराठा आरक्षणाचा (maratha reservation) विषय लगेच सुटणारा नाही. त्याला सहा महिने लागतील. एक वर्षे लागेल. तोपर्यंत मराठा समाजाला पाच मुलभूत सुविधा देण्याबाबत मी सरकारला सुचविले आहे. या मागणीबाबत काही निर्णय झालेला नाही. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मी ठरविले आहे. परत, सरकारला थोडा वेळ द्यायला लागलो आहे. जर त्यात काही निर्णय घेतला नाही. तर, आम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही. पुण्यातून मुंबईपर्यंत 'लाँग मार्च काढण्यात येईल, असे खासदार छत्रपती संभाजीराजे (sambhajiraje) यांनी सांगितले.
चिंचवड येथे संभाजीराजे म्हणाले, ''मराठा आरक्षणाबाबत केंद्र, राज्य सरकारची भूमिका काय आहे. हे मी नेहमी आणि स्पष्टपणाने माझ्या भाषणात मांडली आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत राज्यसभेत जाहीरपणाने बोललो आहे. राज्य शासनाची जबाबदारी काय आहे हेही मी त्यांना सांगितले आहे. आरक्षणाचा विषय लगेच सुटणारा नाही. त्याला सहा महिने लागतील. एक वर्षे लागेल. पण, मागासवर्गीय आयोग स्थापन करुन किंबहूना आयोग स्थापन करता येत नसेल. तर, कमिटी स्थापन करायला पाहिजे. सर्व्हेक्षण करायला पाहिजे. सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. ही राज्य शासनाची जबाबदारी आहे.
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, हे काहीच होत नसेल तर केंद्रात आपण जाऊ शकतो. पण, आज केंद्राचा विषय नाही. त्याचबरोबर सरकार मराठा समाजाला पाच मुलभूत सुविधा देऊ शकते. हे मी सांगितले आहे. या मागणीबाबत काही निर्णय झालेला नाही. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मी ठरविले आहे. परत, सरकारला थोडा वेळ द्यायला लागलो आहे. जर त्यात काही निर्णय घेतला नाही. तर, आम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही. पुण्यातून मुंबईपर्यंत 'लाँग मार्च काढण्यात येईल.''