पुणे: पुणेरेल्वे विभागात पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावरील शिवाजीनगर–खडकी स्टेशनदरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीच्या विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने रविवारी पुण्यावरून मुंबईला जाणा-या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेससह प्रमुख गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने टॅक्सी व इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. परंतु याचा गैरफायदा घेत टॅक्सी, खाजगी वाहन चालकांनी अवाच्या सवा भाडे आकारुन डबल भाडे आकरून प्रवाशांची आर्थिक लूट करत होते. त्यात एसटी बसने जाण्यासाठी शिवनेरी साठी प्रवासांची रांगच रांग लागली असल्याने रेल्व गाडया रहद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करीत डबल भाडे द्यावे लागत असल्याने रेल्वेनी गाड्या रहद केल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. महिनाअखेरचा रविवार असल्यामुळे गावी जाणा-या प्रवाशांची गर्दी झाली होती. ब्लॅकमुळे प्रवाशांचा ओढा टॅक्सी, एसटी आणि टॅव्हल्सकडे वळला. विशेष म्हणजे दिवाळी संपल्यानंतर गावी गेलेले प्रवासी मुंबईकडे परतू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांना जाण्यासाठी खासगी गाड्यांशिवाय पर्याय नव्हता. परंतु प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे सर्व ठिकाणी गर्दी झाली होती. मुंबई मार्गावर एसटीच्या जादा गाड्या सोडले तरी प्रवाशांची गर्दी कमी होत नसे. १०० रुपयात होणारा रेल्वेचा प्रवास ५०० ते ७०० रुपयापर्यंत मोजावा लागत असल्याने सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात खासगी वाहन चालकांकडून जादा भाडे आकारले जात होते.
यावेळी प्रवासी गौरव कंगाले म्हणाले, मुंबईवरून पुण्याला रविवारी परीक्षा देण्यासाठी आलो. पुणे मुंबई रेल्वे गाड्या रद्द झाल्याने पुणे बस स्थानक या ठिकाणी दादरला जाण्यासाठी निघालो. इथे शिवनेरी 515 रुपये दर तर खासगी वाहने 700 ते 800 रुपये द्यावे लागत आहे. त्यातही दीड ते दोन तास रांगेत थांबून तिकीट घ्यावे लागत आहे.