पुणे: शहरातील जंगली महाराज रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या जागेवर असलेल्या जेएम कॉर्नर नावाच्या चौपाटीमध्ये अनाधिकृतपणे लहान मोठी २० दुकाने सुरू होती. या अनाधिकृत दुकानावर पालिकेने कारवाई करून पाडली. यामध्ये ३ हजार चौरस क्षेत्र मोकळे करण्यात आले. एक महिन्यापुर्वी कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली होती. त्यानंतर एल ३ पबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरु असल्याचे समोर आले. तेथे अंमलीपदार्थांचे सेवनही करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेची कारवाई सुरू आहे.
जंगली महाराज रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या जागेवर असलेल्या जेएम कॉर्नर नावाच्या चौपाटीमध्ये अनाधिकृतपणे लहान मोठी सॅनक्स, हॉटेल अशी २० दुकाने सुरू होती. या दुकानावर पालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करून ३हजार ४०० चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. जेसीबी, दोन गॅस कटर, बिगारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या दुकानदारांना १५ दिवसापुर्वी नोटीस दिली. त्यानुसार कारवाई करण्यात आली अशी माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाचे सुनिल कदम यांनी दिली.