पुणे : महापालिकेच्या विविध प्रकल्पांना व विकासकामांना निधी कमी पडत असल्यामुळे एकूण अंदाजपत्रकात १० टक्के कपात करण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प व विकासकामांसाठी २०९ कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात १० टक्के कपात करून हा निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेते, महापालिका आयुक्त, सर्व विभागांचे प्रमुख यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरामध्ये डेंगळे पूल, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कोथरूड येथील उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. यासाठी आर्थिक तरतूद आवश्यक आहे.शहारामधील तीन रुग्णालयांची कामे सुरू आहेत. त्यासाठी निधी आवश्यक आहे. महापालिकेच्या वेगवेगळ्या भागांतील शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी २८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. घनकचरा विभागाच्या प्रकल्पासाठी तरतूद आवश्यक आहे.सर्व विभागांशी चर्चा करण्यात आल्यानंतर २०० कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार प्रशासनाकडून स्थायी समितीला प्रस्ताव दिला जाणार आहे.
पुणे महापालिका : अंदाजपत्रकात १० टक्के कपात,विकासकामांसाठी २०९ कोटी रुपयांची होती मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 7:05 AM