पुणे : पुणे महापालिका प्रशासनाने १ ते ३१ आॅगस्ट पर्यंत जाहिर केलेल्या नव्या लॉकडाऊनमध्ये पूर्वीच्याच निर्णयांची पुनारूवृत्ती केली आहे. मात्र, हे करीत असताना काही मोजक्या नवीन बाबींना सशर्त परवानगी देऊ केली आहे़.दरम्यान, शहरातील व्यायामशाळांना मात्र अद्याप कुठलीही परवानगी मिळालेली नाही.
कोरोनाचा प्रभाव कमी न होता वाढतच चालल्याने, राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेनेही आपली शहराकरिताची नवी नियमावली जाहिर केली आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ म्हणून जारी करण्यात आलेल्या या नव्या आॅर्डरमध्ये जुन्याच नियमावलीची री ओढण्यात आली आहे. हे करताना मोठी अपेक्षा असलेली पूर्ण दिवस सर्व दुकांनाना परवानगी मात्र देण्यात आलेली नाही. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बिगर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने पी-१, पी-२ पध्दतीनेच सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील खालील बाबी सुरू राहतील.
प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन)
* अत्यावश्यक सेवा : किराण दुकान, भाजीपाला विक्री, दुध विक्री व रेशन दुकाने
(सकाळी ८ ते दुपारी १२ व सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत)
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील परवानगी
* सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने व सेवा म्हणजेच मेडिकल, दवाखाने
* सर्व बिगर अत्यावश्यक वस्तूंची दुकाने यापूर्वीच्या आदेशाप्रमाणेच पी-१ , पी-२ पध्दतीने सकाळी ९ ते सायंकाळी ७ यावेळेत खुली राहतील.
* मद्यविक्रीच्या दुकानास यापूर्वी संबंधितांना घरपोच परवानगी मिळाली असल्यास ते घरेपाच सेवा किंवा नेहमीच्या पध्दतीनेप्रमाणे सुरू राहतील.
* महात्मा फुले मंडई मधील सम क्रमांकाचे गाळे सम दिनांकास व विषम क्रमांकाचे गाळे विषम दिनांकास उघडी राहतील.
* ई कॉमर्स सेवा व कुरिअर सेवा
* मजूरांच्या निवासाची व्यवस्था असलेली बांधकामाची ठिकाणे
* खाद्यपदार्थ पार्सल सेवा
* आॅनलाईन व दुरस्थ शिक्षण आणि अनुषंगिक बाबी
* सर्व खाजगी कार्यालये त्यांच्या कर्मचारी संख्येच्या जास्तीत जास्त १० टक्के अथवा १० व्यक्ती़
* माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यवसाय ५० टक्के उपस्थितीत
* छोटे स्वयंरोजगार करणारे व्यक्ती उदा़ प्लंबर, इलेक्ट्रिशियन
*वाहन दुरूस्ती गॅरेज
* शैक्षणिक संस्था यांची कार्यालये / कर्मचारी अशैक्षणिक कामाकरिता़
* केश कर्तनालय, ब्युटीपार्लर यापूर्वी निश्चित केलेल्या अटींवर
* बँका
* विवाह सोहळे व तत्सम कार्यक्रम ५० व्यक्तींच्या उपस्थितीत
------------
वाहन
वाहनचालक व तीन प्रवाशांसह टॅक्सी / कॅब यांना, २ प्रवाशांसह रिक्षांना व दुचाकींना केवळ वाहन चालविणारी व्यक्ती यांना हेल्मेट व मास्कसह परवानगी देण्यात आली आहे.
-----------
यास बंदी राहिल तसेच याचा वापर अनिर्वाय असेल
* सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना मास्कचा वापऱ
* दोन व्यक्तींमधील अंतर राखणे जरूरी़ दुकानदार व ग्राहकांमध्ये शारिरिक अंतर राखण्याची निश्चिती करतील़
* सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मद्यपान, पान, तंबाखू सेवनास मनाई
* प्रत्येक कार्यालयांमध्ये स्क्र ीनिंग व सॅनिटायझर वापर व वारंवार निर्जंतुकीकरण
* वैयक्तिक व्यायाम करण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबींना उदा जिम ला परवानगी नाही़
* कामाच्या ठिकाणी कोविड-१९ वर उपचार होणाºया मनपाच्या दवाखान्यांची यादी लावणे बंधनकारक
-------------------------------