पुणे : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चाललेली असल्यामुळे पालिकेला भविष्यात आयसीयू आणि व्हेंटीलेटर्सची आवश्यकता भासणार आहे. पालिकेकडून खासगी रुग्णालयांसोबत करारनामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत दहा रुग्णालयांसोबत पालिकेने करारनामे केले आहेत. तब्बल सोळा बड्या रुग्णालयांना पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दणका दिला आहे. या रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा नियंत्रित करण्याचे आदेशच आयुक्त गायकवाड यांनी बुधवारी संध्याकाळी काढले.
शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता महापालिका आणि जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना तसेच अन्य सर्व प्रकारच्या रुग्णांवरील उपचारांसाठी राज्य शासनाने अधिसूचना काढली होती. त्यानुसार पालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना आदेश दिले होते. लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेला आहे. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण आणि अतिगंभीर रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरुन शासनाने यापुर्वीच ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याबाबत आदेश दिलेले आहेत. भविष्यात पालिकेला आयसीयू आणि व्हेंटीलेटर्सची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर पडणार आहे.
पालिका आयुक्तांनी अधिकारांचा वापर करीत सोळा खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा नियंत्रित करण्याचे आदेश दिले आहेत. यातील ५० टक्के खाटा या कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत. शासनाने निश्चित करुन दिलेल्या दरांनुसार या खाटांचे बिल आकारावे अशा सूचना करण्यात आल्या असून उपचारांचे बिल पालिका देणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. उपचारांचा खर्च संबंधित रुग्णालाच करावा लागणार आहे.=====पालिकेने यापुर्वी दहा रुग्णालयांसोबत करारनामे करुन कोरोनाग्रस्त रु ग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करुन घेतली आहे. भविष्यात आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासणार आहे. काही खासगी रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित करणे आवश्यक होते. शहरातील सोळा रुग्णालयांमधील खाटा नियंत्रित करण्यात आल्या असून आवश्यकतेनुसार त्याचा वापर केला जाईल. खाटा नियंत्रित केल्या याचा अर्थ त्या ताब्यात घेतल्या असे नाही किंवा राखीव ठेवल्या असेही नाही.- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महानगरपालिका======कोणती आहेत रुग्णालयेरुबी हॉल क्लिनिक, जहांगिर रुग्णालय, रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल, सह्याद्री रुग्णालय येरवडा, रत्ना हॉस्पिटल, देवयानी हॉस्पिटल, शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल, संजीवन हॉस्पिटल, ज्यूपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, कोलंबिया आशिया हॉस्पिटल खराडी, श्री क्रिटिकेअर अॅन्ड ट्रॉमा सेंटर हॉस्पिटल, विलू पुनावाला हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल औंध, इनामदार हॉस्पिटल=======रुग्णालयातील खाटांचा तपशीलएकूण खाटा ३०३४ऑपरेशनल बेड्स २२३७रेग्यूलेटेड बेड्स १७८६ऑक्सिजन बेड्स ९२९आयसीयू बेड्स १८९व्हेंटिलेटर बेड्स ८५