शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पुणे महापालिकेकडून तब्बल ४२ ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; सर्वाधिक क्षेत्र हडपसर- मुंढव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 1:58 PM

नोव्हेंबरनंतर कमी होत गेलेले कोरोना बाधित फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून झपाट्याने वाढू लागले आहेत....

ठळक मुद्देढोले-पाटील रस्ता, कसबा, औंध, कोथरूड, येरवड्यात दिलासा

पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. रुग्ण आढळून प्रमाण अधिक असलेल्या शहरातील 42 भाग ‘सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहेत. पालिकेच्या 15 पैकी दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही क्षेत्र असून पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकही क्षेत्र नाही.

नोव्हेंबरनंतर कमी होत गेलेले कोरोना बाधित फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर अधिक खबरदारी बाळगण्यात येत आहे. शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली असून शाळा-महाविद्यालये आणि खासगी क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार, पालिकेने ज्या भागात करोना रूग्ण वाढत आहेत असे भाग सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र निश्चित काही प्रमाणात निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे.===सोसायट्यांमध्ये प्रवेश बंद* बाहेरील नागरिकांना सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई* या सोसायट्यांच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात येणार* रुग्णांच्या घरातील नातेवाईक, व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई* सोसायटीच्या सभासदांची बैठक घेऊन सूचना देत एकत्र येण्यास मनाई केली जाणार* या  सोसायट्यांमधील कच-याची पालिकेकडून स्वतंत्रपणे विल्हेवाट===बाधित नसलेल्यांना कामाची मुभाज्या घरात कोणीही बाधित नसतील त्यांना दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडता येणार आहे. त्यांच्यावर बंधने असणार नाहीत. त्यांना सुरक्षित वावर ठेऊन सोसायटीत ये- जा करता येणार आहे.===शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्याला अटकाव करणे आवश्यक आहे. त्याकरिता पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु आहेत. शहरात 42 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी आणि खबरदारी बाळगणे गरचेचे आहे.- रूबल अगरवाल (अतिरिक्त महापालिका आयुक्त)------क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रवानवडी 03नगर रस्ता 03सिंहगड रस्ता 04बिबवेवाडी 05हडपसर 07शिवाजीनगर 04धनकवडी 05वारजे-कर्वेनगर 04कोंढवा-येवलेवाडी 02भवानी पेठ ०५

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या