पुणे : महापालिकेच्या ५८ प्रभागांमधील अनुसुचित जाती (एस.सी.) व अनुसुचित जमातीच्या (एस.टी.) प्रभागांचे आरक्षण बुधवारी रात्री पावणे बारा वाजता महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. यात एस.सी. प्रवर्गासाठी २३ व एस.टी. प्रवर्गाच्या २ जागांचे प्रभाग घोषित करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांची अंतिम प्रभाग रचना आणि नकाशे १७ मे रोजी जाहीर केले. तर नेहमी प्रमाणे महापालिकेच्या निवडणूक विभागाने रात्री उशिरा संकेतस्थळावर आरक्षित प्रभागांची नावे जाहीर केली.
५८ प्रभागात असलेल्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत असलेली एस.सी. आणि एस.टी. प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार हे आरक्षण निश्चित करण्यात आले. परंतु जोपर्यंत महिला आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत महिला एस.सी. आणि एस.टी.आरक्षणबाबतचे चित्र स्पष्ट होणार नाही. त्यामुळे महिला आरक्षण कधी जाहीर होणार याची उत्सुकता आता इच्छुकांना आहे. ५० टक्के महिला आरक्षणानुसार ५८ पैकी २९ प्रभागांमध्ये प्रत्येकी २ महिला उमेदवार असणार असून, एक खुल्या प्रवर्गातील तर एक आरक्षित प्रवर्गातील असणार आहे.अनुसुचित जातीचे आरक्षित प्रभागप्रभाग क्र. २० - पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड एकूण लोकसंख्या : ६७ हजार १२९ - अनुसुचित जाती लोकसंख्या :१९ हजार ५६२प्रभाग क्र. ५०- सहकारनगर - तळजाई एकूण लोकसंख्या : ६१ हजार २४४अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार ३२प्रभाग क्र. ४८ - अप्पर सुप्पर-इंदिरानगर एकूण लोकसंख्या : ५६ हजार ८८४ अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार ६९१प्रभाग क्र. ८ - कळस - फुलेनगर एकूण लोकसंख्या : ६२ हजार २७३ अनुसुचित जाती लोकसंख्या :१५ हजार ५८३प्रभाग क्र. २७ - कासेवाडी लोहियानगर एकूण लोकसंख्या : ६८ हजार ५९१ अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार ६९प्रभाग क्र. ९ - येरवडा एकूण लोकसंख्या : ७१ हजार ३९०अनुसुचित जाती लोकसंख्या : १६ हजार १३९प्रभाग क्र.११ - बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकूण लोकसंख्या : ६२ हजार २६९अनुसुचित जाती लोकसंख्या : १३ हजार ११५प्रभाग क्र. ७ - कल्यानीनगर-नागपुरचाळ एकूण लोकसंख्या : ६७ हजार ७३९ अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार १५४प्रभाग क्र. ३७ - जनता वसाहत- दत्तवाडी एकूण लोकसंख्या : ६९ हजार ६७२ अनुसुचित जाती लोकसंख्या : १४ हजार २०९ प्रभाग क्र- ३८- शिवदर्शन -पद्मावती एकूण लोकसंख्या : ६४ हजार २२१अनुसुचित जाती लोकसंख्या : १३ हजार ४३प्रभाग क्र. १ - धानोरी-विश्रांतवाडी एकूण लोकसंख्या : ५५ हजार ४८८अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ९२७प्रभाग क्र. ४२ - रामटेकडी-सय्यदनगर एकूण लोकसंख्या : ४९ हजार २५अनुसुचित जाती लोकसंख्या : ९ हजार ३७०प्रभाग क्र. २६ - वानवडी गावठाण-वैदुवाडी एकूण लोकसंख्या : ५९ हजार २०अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ९९३प्रभाग क्र. २२ - मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी एकूण लोकसंख्या : ६१ हजार ८७८ अनुसुचित जाती लोकसंख्या : ११ हजार ४९४प्रभाग क्र. १०- शिवाजीनगर गावठाण- संगमवाडीएकूण लोकसंख्या : ६२ हजार ४८१अनुसुचित जाती लोकसंख्या : ११ हजार ४९४प्रभाग क्र. ३९ - मार्केटयार्ड-महर्षीनगर एकूण लोकसंख्या : ६० हजार ५३७ अनुसुचित जाती लोकसंख्या : १० हजार ८५४ प्रभाग क्र. २१ - कोरेगाव पार्क - मुंढवा एकूण लोकसंख्या : ६७ हजार ५७४ अनुसुचित जाती लोकसंख्या ११ हजार ७६१प्रभाग क्र.४७ कोंढवा बु.-येवलेवाडी एकूण लोकसंख्या : ५४ हजार ४९२ अनुसुचित जाती लोकसंख्या : ९ हजार २०६प्रभाग क्र. ४६ - मोहमंदवाडी-उरुळी देवाची एकूण लोकसंख्या : ५२ हजार ७२०अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार २६प्रभाग क्र.१९ - छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम- रास्ता पेठ एकूण लोकसंख्या : ५८ हजार ९९४ अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ७८५प्रभाग क्र.- ४ - पुर्व खराडी- वाघोली-एकूण लोकसंख्या : ५८ हजार ९१२अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ५६४प्रभाग क्र- १२ - औंध-बालेवाडी एकूण लोकसंख्या : ६३ हजार ३६२अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ९९६प्रभाग क्र. ३ - लोहगाव- विमाननगर - एकूण लोकसंख्या : ६१ हजार ८३६अनुसुचित जाती लोकसंख्या : ८ हजार ५९२अनुसुचित जमाती आरक्षित प्रभागप्रभाग क्र.- १ - धानोरी- विश्रांतवाडीएकूण लोकसंख्या : ५५ हजार ४८८ अनुसुचित जमाती लोकसंख्या : १ हजार ६५२प्रभाग क्र. १४ - पाषाण - बावधान बुद्रुक एकूण लोकसंख्या : ५७ हजार ९९५ अनुसुचित जमाती लोकसंख्या : १ हजार ६२८इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणबाबत येत्या १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी असल्याने, मध्यप्रदेश राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ओबीसी आरक्षण मिळण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात निवडणूक घेणार नाही, ही निवडणूक आयोगाची भूमिका असल्याने पुणे महापालिका निवडणूक ही सप्टेंबर नंतरच होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण बाबत कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारला मोठा अवधी मिळणार आहे.