शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

फ्री बेडची माहिती आता आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 7:41 AM

महापालिकेकडून सवलतीच्या दरात जागा घेऊन त्यावर रुग्णालय बांधणाºया मोठ्या रुग्णालयांच्या व्यवस्थापनांना त्यांच्या एकूण बेडच्या प्रमाणात दहा टक्के बेड महापालिकेला विनामूल्य द्यावे लागतात.

पुणे : महापालिकेकडून सवलतीच्या दरात जागा घेऊन त्यावर रुग्णालय बांधणाºया मोठ्या रुग्णालयांच्या व्यवस्थापनांना त्यांच्या एकूण बेडच्या प्रमाणात दहा टक्के बेड महापालिकेला विनामूल्य द्यावे लागतात. मात्र त्यांच्याकडून हे बंधन पाळले जात नसल्यामुळे आता महापालिकेच्या वतीने या फ्री बेडची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. त्या-त्या रुग्णालयांनाही त्यांच्या संकेतस्थळावर अशी माहिती टाकण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. शिवसेना नगरसेवक बाळा ओसवाल व विशाल धनवडे यांनी हा प्रस्ताव समितीला दिला होता. रुग्णालयांच्या या माहिती दडवण्यामुळे महापालिकेला शक्य होत असूनही गरीब रुग्णांना या सेवेचा लाभ देणे शक्य होत नाही. फक्त बेड फ्री मिळाला तरी रुग्णांच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते असा ओसवाल व धनवडे यांनी प्रस्तावात म्हटले होते.मोहोळ यांनी सांगितले, की प्रस्तावाची त्वरित अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे. शहरात रुबी हॉलमध्ये १२, सह्याद्री-डेक्कनमध्ये ५, सह्याद्री-बोपोडीमध्ये ३०, बुधराणीमध्ये १० व एम्समध्ये १० असे विनामूल्य बेड उपलब्ध आहेत. ते पालिकेचे आहेत. त्यामुळे महापालिकेने शिफारस केलेल्या रुग्णांना ते विनामूल्य मिळतील. त्याचे शुल्क रुग्णालयाला घेता येणार नाही. ही सर्व माहिती यापुढे महापालिकेच्या संकेतस्थळावर मिळेल, ती अपडेट केली जाईल, असे मोहोळ म्हणाले.