पुणे - मंत्रालयातील उंदरांचा विषय गाजत असतानाच आता पुणे महापालिकेतही झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. उंदरांच्या वाढत्या संख्येमुळे महत्त्वाच्या फाईलींना धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने सलग दोन दिवसांच्या सुट्यांमुळे सर्व कार्यालयांमध्ये ‘पेस्ट कंट्रोल’ करून घेतले.महापालिकेचा नगरसचिव विभाग आणि पदाधिकारी दालने यांच्या साफसफाईचे काम नगरसचिव विभागांतर्गत चालते. यावर नगरसचिव देखरेख ठेवतात. महापालिका भवनाच्या तिसरा मजल्यावर पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. यामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना यांची कार्यालये आहेत. त्याचबरोबर स्थायी समिती हॉल आणि नगरसचिव विभाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी उंदीर आणि झुरळे यांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी असलेल्या स्थायी समिती हॉलमध्ये बैठकांच्या वेळेस जेवणावळी घेण्यात येतात, त्यामुळे या ठिकाणी उंदीर आणि झुरळांचा संख्येत वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहेत.पालिकेत वाढले उंदीरमहापालिकेतील उंदरांच्या संख्येत वाढ झाली असून, कार्यालयीन वेळेत देखील कर्मचाºयांना उंदीर, झुरळांचा त्रास होत आहे. त्यात पदाधिकाºयांच्या कार्यालयामध्ये फॉल सिलिंग करण्यात आले आहे. यामध्ये एसी बसवण्यात येतात. यामध्ये उंदीर जाऊन बसतात. त्यामुळे अनेक वेळा एसी बंद पडल्याचे समोर आले.महापौर कार्यालयातील एसीसुद्धा यामुळे बंद पडला होता. त्यामुळे शनिवार व रविवार अशा सलग दोन दिवस सुट्या आल्यामुळे कार्यालयांमध्ये औषध फवारणीकरण्यात आली.
मंत्रालयानंतर पुणे महापालिकेतही झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 3:55 AM