पुणे महानगरपालिका : विसर्जनाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 02:15 AM2018-09-23T02:15:49+5:302018-09-23T02:16:08+5:30

: पठार, आंबेगाव, जांभुळवाडी तलाव, नºहेगाव येथे गणेश विसर्जन तयारी पूर्ण झाली आहे.

 Pune Municipal Corporation: Prepare for immersion | पुणे महानगरपालिका : विसर्जनाची तयारी पूर्ण

पुणे महानगरपालिका : विसर्जनाची तयारी पूर्ण

Next

आंबेगाव बुद्रुक : पठार, आंबेगाव, जांभुळवाडी तलाव, नºहेगाव येथे गणेश विसर्जन तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रत्येक गणेश विसर्जन घाटावर नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक घाटावर निर्माल्यकलश ठेवले
आहेत.
फवारणीनाशक करण्यात आले आहे. जांभुळवाडी तलाव, घाटावर पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी मूर्तिदान स्वीकारणार आहेत. जांभूळवाडी तलावावर कात्रज अग्निशमन दलाचे कर्मचारी नेमणूक करण्यात आले आहेत.
राजे चौक, साईसिद्धी चौक प्रभाग ३९ मध्ये प्रथम आंबेगाव पठार, अहिल्यानगर, साईनाथनगर, साईसिद्धी चौक व सर्व्हे नं. १६ साठी महापालिकेच्यावतीने विसर्जन हौद ठेवून नागरिकांची सोय करण्यात आली आहे.
आंबेगाव बुद्रुक येथे गणेश विसर्जनासाठी आंबेगाव बस स्टॉप या ठिकाणी शेवटच्या विसर्जनासाठी हौदाची निर्मिती करण्यात आली
आहे.
तसेच आंबेगाव पठार येथील सर्व्हे नं. १५ साठी आंबेगाव पठार येथील चिंतामणी प्राइड शाळेजवळ व कात्रज बाह्यवळण मार्गावर अशोक लेलँड गॅरेजजवळ विसर्जन हौद ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी गणेशमूर्ती हौदामध्ये विसर्जन करून निर्माल्य बाजूला ठेवलेल्या कलशामध्ये ठेवण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.
 

Web Title:  Pune Municipal Corporation: Prepare for immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.