पुणे: शहरातील हाॅटेल, बार आणि पब मध्ये मोठया प्रमाणात बेकायदेशीरपणे ड्रग्स आणि मद्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर फग्यसन कॉलेज रस्ता, शिवाजीनगर आणि खराडी येथील हॉटेल, पब, बार आणि रेस्टॉरट यांच्या फ्रंट आणि साइड मार्जिन मध्ये विनापरवाना उभारण्यात आलेल्या शेडवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली. एल ३ पबसह २९ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३६ हजार ८४५ चौरस फुट क्षेत्र रिकामे करण्यात आले.
गेल्या महिन्यात कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई थंडावली होती. मात्र, पुन्हा मंग़ळवारी थेट राज्यसरकारकडुन सूचना आल्याने महापालिकेकडून सकाळ पासूनच फर्गुसन रस्त्यापासून कारवाईस सुरूवात करण्यात आली. दिवसभरात बाणेर, खराडी, औंध, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर या भागात अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने जोरदार कारवाई केली. या कारवाईत ९ हॉटेल, पब, बार आणि रेस्टॉरट यांच्या फ्रंट आणि साइड मार्जिन मध्ये कारवाई केली. एल ३ पब मध्ये ड्रग्जची पार्टी झाली होती. त्या पबवर पालिकेने कारवाई केली. या पबचे अनाधिकृत बांधकाम तोडण्यात आले
गुन्हा दाखल करण्यास सुरवात , कारवाई यापुढे सुरूच ठेवणार
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग सातत्याने हॉटेल, बार आणि रेस्टॉरट यांच्यावर कारवाई करतो. पण त्यानंतर संबंधित हॉटेल चालक आणि मालक हे पुन्हा अतिक्रमण करतात. त्यामुळे पालिकेने या हॉटेलवर गुन्हा दाखल करणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. महापालिका यापुढे अशीच कारवाई च सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
एरवी बंदोबस्त न देणारे पोलिस स्वताहुन फोन करत होते
शहरातील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालिकेला पोलिसाचा बंदोबस्त घ्यावा लागतो. या बंदोबस्तासाठी पालिकेला पोलिसाकडे सातत्याने मागणी करावी लागते. पण आज पोलिस स्वताहुन पालिकेच्या बांधकाम विभागाला कुठे कारवाई करायची आहे बंदोबस्त हवा आहे का याची विचारणा करत होते.
कारवाई केलेले ठिकाण, क्षेत्र
हॉटेल द अर्बन हारवेस्ट वडगाव बुद्रक १ हजार १२५ चौरस फुट, ७ अ रेस्टोरट बार खराडी ३ हजार चौरस फुट, स्पाईन फक्टरी खराडी २हजार ५०० चौरस फुट, माफिया बार आणि रेस्टॉरंट खराडी १ हजार चौरस फुट, बालेवाडी हाय स्ट्रीट आयन बार ३ हजार २०० चौरस फुट,द आर्बन फॉडरी , टेटुलिया बॅरिस्टो, नबाब एशिया ४ हजार ८०० चौरस फुट, पार्क ग्रॅडूअर इमारत, टेल्स ॲन्ड स्पीरीट, हॅप्पी ॲण्ड हार्ट, द इनडिपेडस डे ९०० चौरस फुट, बटर ॲन्ड बार २हजार ५०० चौरस फुट , एल ३ हॉटेल शिवाजीनगर १२५ चौरस फुट, सुप्रिम स्नडविच कॉर्नर शिवाजीनगर ४०० चौरस फुट, चैतन्य पराठा हॉउस ८२५ चाैरस फुट, हॉटेल ग्रीन सिग्नल आपटे रोड ६०० चौरस फूट, हॉटेल वैशाली ५हजार चौरस फुट, शिरोळे मॉल उमेश शिरोळे ६ हजार ७४५ चाैरस फुट, नफीस सौदागर ५२०चौरस फूट, संतोष जाधव २४० चौरस फूट, युसूफ शेख ६९्०चाैरस फुट, एन.व्ही. बांदल १८० चाैरस फुट, मयुर जोशी ३०० चाैरस फुट, तुषार गवारे २२५ चाैरस फुट, कमलेश यादव ४५० चाैरस फुट, सुमित चांदणे कुणाल नागवडे ३५० चाैरस फुट, साईनाथ सायकल मार्ट ४०० चाैरस फुट, नफिस सौदागर ३५० चाैरस फुट