पुणे : राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे लसीकरणात गोंधळ उडाला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने थेट लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांची भेट घेऊन महापौरांकडून त्यांना विनंती केली जाणार आहे. साधारण १० लाख लसी मिळाव्यात अशी विनंती केली जाणार आहे. पुणे महापालिकेकडून जवळपास १०० हुन अधिक केंद्रावर लसीकरण सुरु आहे. मात्र महापालिकेला राज्य सरकारकडून येणाऱ्या लसी पुरेशा नसल्याने वारंवार लसीकरणात अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर येत आहे. त्यामुळे आता पुणे महापालिका थेट लस खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले “आम्ही लसींची थेट खरेदी करायला तयार आहोत. त्यासाठी निधीची तरतूद करण्याचीही महापालिकेची तयारी आहे. त्याच्या चर्चेसाठी सिरम इन्स्टीट्यूटच्या आदर पुनावाला यांची भेट मागितली आहे. त्यांची वेळ मिळाली की याविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल”