पुणे : बिबवेवाडी परिसरातील डोंगरावरचे पाणी कृत्रिम रित्या केके मार्केट येथे आंबिल ओढ्याला जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आंबील ओढा लगत राहणाऱ्या नागरिकांना आता आस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकटांचा ही सामना करण्याची वेळ आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन कदम यांनी केला आहे.
आंबिल ओढ्याला २५ सप्टेंबर २०१९ रोजी पुर आला. या पुराची नाल्यालगत राहणाऱ्या दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना त्याची झळ बसली. त्यामध्ये सहा जणांना जीव गमवायची वेळ आली. कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली. त्याच्यावर उपाययोजना म्हणुन नाला रुंद करणे, खोल करणे, सीमा भिंत बांधणे, अतिक्रमण काढणे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
बिबवेवाडी परिसरातीलच्या टेकड्यांवरील पाणी महेश सोसायटी चौकाच्या बाजूने केके मार्केटच्या बाजूला कृत्रिम नाला उभा करायचे काम सत्ताधारी भाजपच्या आशीर्वादाने प्रशासनाने सुरू केल्याचे दिसून येत आहे. वस्तुतः जवळच बिबेवाडी परिसरातील उपनाला उत्सव बिल्डिंग च्या शेजारून हा वाहत असताना त्याला जोडणे नैसर्गिक रित्या अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने आंबील ओढा काठच्या नागरिकांना या परिसरातील पावसाचे पाणी वळविल्यामुळे पावसाळ्यात निश्चित धोका वाढला आहे, असेही नितीन कदम यांनी सांगितले.