शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांवरून पुणे महापालिकेतील नगरसेवक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 5:33 PM

शहरातील वसाहतीमधील निराधार महिला, विद्यार्थी, व अन्य दुर्बल समाज घटकांसाठी राबवण्यात येणार्‍या योजनांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धारेवर धरले.

ठळक मुद्देसर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धरले धारेवरमहापौरांनी नागरवस्ती विभागाच्या कारभाराबाबत शुक्रवारी पक्षनेत्यांची बैठक घेण्याचे केले जाहीर

पुणे : शहरातील वसाहतीमधील निराधार महिला, विद्यार्थी, व अन्य दुर्बल समाज घटकांसाठी राबवण्यात येणार्‍या योजनांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धारेवर धरले. इयत्ता १० वी १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुक्रमे १५ व २५ हजार रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यावर माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी या विभागावर कोरडे ओढण्यास सुरूवात केली. प्रभागांमधील समुह संघटिकांना दर ६ महिन्यांनी नोकरीतून ब्रेक दिला जात असल्याबद्धल तक्रार करण्यात आली. नव्या नियुक्त्या करून सलग १० वर्ष काम केलेल्यांना घरी बसवण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका करण्यात आली.सुभाष जगताप  धीरज घाटे, अजित दरेकर, भैय्या जाधव, महेंद्र पठारे, स्वप्नाली सायकर, गफूर पठाण. दीपक मानकर, आरती कोंढरे, नाना भानगिरे, रघू गौडा, नंदा लोणकर, पल्लवी जावळे, मनिषा लडकत, प्रवीण चोरबेले, अजय खेडेकर, दीपाली धूमाळ, वसंत मोरे, संजय भोसले आदींनी या विषयावरील चर्चेत भाग घेतला. या विभागाचे काम असमाधानकारक असल्याची टीका केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनीही प्रशासना या विभागाकडे लक्ष देत नसल्याबद्धल जबाबदार धरले.विभाग प्रमचख संजय रांजणे यांनी खुलासा करताना विभागाकडे विविध योजनांसाठी असलेल्या निधीची माहिती दिली. तो न पटल्यामचळे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सविस्तर खुलासा केला. अखेरीस महापौर मुक्ता टिळक यांनी मध्यस्थी करत प्रशासनाने हा विषय गंभीरपणे घ्यावा असे सांगितले. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या विषयावर सर्व गटनेत्यांची महापौर दालनात बैठक घ्यावी अशी सुचना केली. ती मान्य करण्यात आली. महापौरांनी नागरवस्ती विभागाच्या एकूण कारभाराबाबत शुक्रवारी पक्षनेत्यांची बैठक घेण्याचे जाहीर केले.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाChetan Tupeचेतन तुपेMukta Tilakमुक्ता टिळक