पुणे : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांना शोधून त्यांना विलगीकरण करून ठेवणे हे आव्हानात्मक काम झाले आहे. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 'क्विक रिस्पॉन्स टीम' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासोबतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम ही पथके करणार आहेत. पुणे महापालिकेने नुकतेच शहराच्या मध्यवस्तीसह जवळपास ६० टक्के पुणे शहर सील केले आहे. याभागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासोबतच नागरिकांचे स्क्रिनिंग करण्याकरिता जवळपास अडीचशे पथके नेमण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त अन्य क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमधेही लक्ष केंद्रित केले जात आहे. पालिकेने अगदी सुरुवातीपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. या सर्वेक्षण आणि तपासणीमधून काही रुग्ण निष्पन्न झाले आहेत. गेल्या दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दिवसाकाठी किमान ४० ते ५० रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे यंत्रणांसमोरील आव्हान वाढत चालले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपकार्तील नागरिक, कुटुंबीय, परिचित यांचा शोध घेऊन त्यांना विलगिकरण करून ठेवण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. पालिकेची एकूण १५ क्षेत्रीय कार्यालये आहेत. या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक कामे सुरू आहेत. यापूर्वीच विविध कामांकरिता गठीत करण्यात आलेली पथके क्षेत्रीय अधिका?्यांच्या अखत्यारीत काम करीत आहेत. आतापर्यंत एखाद्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगिकरण करण्यासाठी मर्यादित मनुष्यबळ होते. परंतु, आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर शीघ्र कृती दल (क्यूआरटी) नेमण्यात आले आहेत. या पथकात, डॉक्टर, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आदी अधिकारी कर्मचा?्यांचा समावेश करण्यात आला आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी १५ पथके नेमण्यात आली आहेत. कोरोनाबधित रुग्ण आढळून आल्यानंतर ही पथके रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संबंधित परिसरातील नागरिकांचा शोध घेऊन पुढील आवश्यक कार्यवाही करणार आहेत.
पुणे महापालिकेचा निर्णय : कोरोनासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 'क्विक रिस्पॉन्स टीम'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 4:47 PM
कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासोबतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम ही पथके करणार आहेत
ठळक मुद्दे पुणे महापालिकेने नुकतेच शहराच्या मध्यवस्तीसह जवळपास ६० टक्के पुणे शहर सील १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी १५ पथकेपालिकेने अगदी सुरुवातीपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास केली सुरुवात