पुणे : पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख पदावर डाॅ. भगवान पवार यांची अवघ्या पाच महिन्यात उचलबांगडी करण्यात आली आहे. पवार यांची सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. पुणे जिल्हापरिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. रामचंद्र हंकारे यांचीही बदली करण्यात आली आहे. हंकारे यांची सहायक संचालक आरोग्य सेवा औदयोगिक विभाग मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
महापालिकेचे आरोग्य प्रमुख आशिष भारती यांची बदली करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले होते. या जागेवर डाॅ. भगवान पवार यांची दोन वर्षांसाठी ११ मार्च २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पाच महिन्याच्या कालावधीत डॉ. भगवान पवार हे वादग्रस्त ठरले होते. त्याचप्रमाणे भारतरत्न अटलबिहारी वाजपेजी वैघकीय महाविघालाचे डीन यांनी १० लाखाची लाच घेतल्याचे प्रकरण डा. भगवान पवार यांना भोवल्याची पालिका वतुळात चर्चा आहे. डॉ. भगवान पवार यांची सहाय्यक संचालक आरोग्य सेवा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम या पदावर तर पुणे जिल्हापरिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. रामचंद्र हंकारे यांचीही सहायक संचालक आरोग्य सेवा औदयोगिक विभाग मुंबई येथे बदली करण्याचे आदेश राज्यसरकारचे अवर सचिव व.पां. गायकवाड यांनी काढले आहेत.
पालिकेला पुर्णवेळ आरोग्यप्रमुख नाही
महापालिकेच्या आरोग्य विभागाला गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ आरोग्य प्रमुख मिळालेला नाही. डाॅ. भारती यांच्यापूर्वी डाॅ. रामचंद्र हंकारे यांच्याकडे प्रतिनियुक्तीने ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. डॉ. भगवान पवार यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पुर्णवेळ आरोग्य करण्यात आल्यानंतर पुन्हा प्रतिनियुक्तीने अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे.