पुणे : पुणेकरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करू देण्यासाठी महापालिकेच्या वतीने हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत; परंतु आर्थिक मंदीमुळे ठप्प झालेली बांधकामे, मिळकतकर आणि पाणीपट्टीची वाढत चालेली थकबाकी व इतर अनेक कारणांमुळे पुणे महापालिकेला चालू आर्थिक वर्षांत तब्बल दोन हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. ही तूट भरुन काढण्याकरिता उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांनी महापालिकेच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठीचे अंदाजपत्रक गुरुवारी स्थायी समितीच्या खास बैठकीत अध्यक्ष हेमंत रासने यांना सादर केले. सन २०१९-२० च्या अंदाजपत्रकातील उत्पन्नाचा आढावा घेतला असता या आर्थिक वर्षासाठी ६ हजार ७६५ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आलेली होती. डिसेंबर अखेरीस महापालिकेला ३ हजार ३४२ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. येत्या तीन महिन्यात उत्पन्नामध्ये आणखी एक हजार कोटी रुपयांची भर पडेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. महापालिका या आर्थिक वर्षात साधारणपणे ४ हजार ५०० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्यांने गतवर्षीच्या अंदाजपत्रकात जवळपास दोन हजार कोटींची तूट येण्याची शक्यता आहे. ====जुन्या योजना पूर्ण करण्यावर भर आयुक्तांनी आपल्या अंदाजपत्रकामध्ये कोणतीही नवीन योजना प्रस्तावित केलेली नाही. महापालिकेकडून सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये भर देण्यात आला आहे. यामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना, नदीसुधार योजना, मेट्रो, बीआरटी, उड्डाणपूल यासारखे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गायकवाड यावेळी म्हणाले.
पुणे पालिकेच्या उत्पन्नाला आर्थिक मंदीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 5:27 PM
पुणे महापालिकेला चालू आर्थिक वर्षांत तब्बल दोन हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता...
ठळक मुद्देया आर्थिक वर्षासाठी ६ हजार ७६५ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता तूट भरुन काढण्याकरिता उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर भर देण्यात येणार डिसेंबर अखेरीस महापालिकेला ३ हजार ३४२ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले