चाकण : पुणे - नाशिक या राष्ट्रीय महामार्गालगत नागरिक रस्त्यालगत प्लॅस्टिक पिशव्यांसह घनकचरा टाकत आहे.त्यामुळे दुर्गधी सुटून एक प्रकारे रोगराईला आमत्रंण मिळत आहे.चाकण शहरातून पुण्याकडे जाताना या कचऱ्यांचे दर्शन प्रवाशांना घडत आहे.मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
चाकण जवळील मेदनकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पुणे नाशिक या राष्ट्रीय महामार्गालगत मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कचरा टाकण्यात येत आहे.नाणेकरवाडी हद्दीतील उड्डाणपूलापासून ते गवतेवस्तीपर्यंतच्या दरम्यान महामार्गालगत नागरिक हॉटेल व्यवसायिक तसेच शहरातील नागरिक येऊन या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे चित्र दिसत आहे.यामध्ये मेलेल्या कोंबडया, खानवळीत कापण्यात आलेल्या कोंबडयांचे निर उपयोगी अवयव, हॉटेलमध्ये उरलेले अन्न,प्लॅस्टिक पिशव्या, घनकचरा बाटल्या या ठिकाणी बिनधास्तपणे टाकत आहे.
कचरा अनेक दिवसांपासून उचलला नसल्याने या ठिकाणी मोठी दुर्गधी सुटली आहे.चाकण शहरातून पुण्याकडे जाताना या कचऱ्याचे दर्शन प्रवाशी व वाहन चालकांना घडत आहे.टाकण्यात येत असणाऱ्या कचऱ्यावर कोणाचाही अंकुश नाही. कचऱ्याची दुर्गधी सुटून या ठिकाणी रोगराई होण्याची भिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रशासनाने अटकाव करावा अशी नागरिकांची मागणी होत आहे.
----
लोकप्रतिनीधींचा वावर तरी त्यांना कचरा दिसतच नाही
--
चाकण तळेगाव चौक उड्डाणपुल ते गवतेवस्ती - आळंदी फाटा या दरम्यानच रस्ता अक्षरशः डपिंग एरिया झाला आहे. पुण्याकडे जात असताना रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पडलेला हा कचरा वाहनचालकांच्या नजरेतून सुटत नाही. या महामार्गावरून खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी नेहमीच ये जा करत आहेत. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठलेला कचरा उचलण्यात दिरंगाई होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. स्थायिक ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तरी हा कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला सांगू शकत का नाही ? असा प्रश्न नागरिक करत आहेत.
--
फोटो ओळी : फोटो : पुणे -नाशिक महामार्गालगत टाकण्यात येत असलेला कचरा.